Sant Santaji Maharaj Jagnade
पुणे - श्री संताजी महाराज तेली संस्था सुदूंबरे या संस्थेची पंचवार्षीक निवडणूक सुदूंबरे येथे 28/12/16 रोजी संपन्न झाली. वार्षीक सभेचे आर्थीक कामकाज पुर्ण झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. या वेळी इच्छुक उमेदवारांनी आपले नाव जाहिर केल्यानंतर सर्व सहमतीची प्रक्रिया सुरू झाली या वेळी संस्थेचे राहिलेले साधारणतहा 30 लाखाचे काम पुर्ण करण्याची जबाबदारी श्री. शिवदास उबाळे यांनी स्विकारली
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचा पुणे विभागीय सहविचार मेळावा दिनांक 5 फेब्रुवारी 2017 रोजी, क्रीडा संकुल, मंचर, ता आंबेगाव, जि. पुणे येथे संपन्न झाला अतिशय उत्साहपुर्ण वातावरणात पदनियुक्ती आणि सत्कार सोहळा पार पडला. कार्यक्रमास महासचिव डॉ भूषण कर्डीले सर सपत्नीक उपस्थित होते, त्यांनी या मेळाव्यात मार्गदर्शन करताना समाजातील एकोपा टिकवण्यासाठी सर्वांनी बरोबरीने काम करण्याचा सल्ला दिला. नवीन आघाड्याची माहिती दिली.
आपल्या प्रास्ताविकात मारुती फल्ले सर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, आणि अशा मेळाव्याची गरज पटवून दिली. राजकीय इच्छाशक्ती समाजाने जागवून आपले अस्तित्व अधोरेखित करण्याचे आवाहन केले.
ओबीसी भटक्या विमुक्त जनजाती विमाप्र व मुस्लीम ओबीसी अल्पसंख्यांकांचा महामेळावा
ओबीसी महासभा महाराष्ट्र प्रदेश व ओबीसी प्रहार (मासिक) यांचे संयुक्त विद्यमाने ओबीसी भटक्या विमुक्त जनजाती विमाप्र व मुस्लीम ओबीसी अल्पसंख्यांकांचा महामेळावा उद्यान प्रसाद मंगल कार्यालय, सदाशिव पेठ, पुणे 30 येथे 4 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. सदरच्या महामेळाव्यास महाराष्ट्रातील विविध भागातुन हजारो लोक आलेल होते.
जुन्नर येथील माजी नगरसेवक व सुदुंबरे संस्था माजी सचीव जेष्ठ समाजसेवक श्री वसंत रघुनाथ करडिले यांचे पुतने नगरसेवक तेली समाज भुषण अविनाश दत्तात्रय करडिले यांची जुन्नर नगरपरीषदेच्या स्विकृत सदस्य पदी निवड झाल्या बद्दल अभिनंदन हार्दिक शुभेच्छा . शुभेच्छूक - वसंत रघुनाथ करडिले
ओबीसीहिताची बाजू न्यायालयात मांडणार
पुणे :- सरकारने राज्य मागासवर्ग आयोगावर केलेल्या नियुक्ता बेकायदेशीर असल्याने त्या तत्काळ रद्द करून नव्याने आयोगाची रचना करावी , अशी मागणी ओबीसी संघर्ष समितीतर्फे करण्यात आली. मराठा आरक्षणाविषयक उच्च न्यायालयातील याचिकेवर 435 ओबीसी जातींतर्फे ओबीसीहिताची बाजू प्रखरपणे मांडली जाईल, असा निर्णय घेण्यात आला. याबाबतचे प्रतिज्ञापत्र या आठवड्यात सादर केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.