विचार मंथनातून समोर आलेले सत्य श्री. संतश्रेष्ठ संताजी महाराज जगनाडे, तेली संस्था सुदुंबरे ट्रस्ट, नवीन कार्यकारणी (2017/2021) साठी तयार झाली त्याबद्दल सर्व समाजबधवांना मनापासुन खुप आनंद झाला. तसेच सर्व नवीन कार्यकर्णीस मनापासून हार्दिक शुभेच्छा ! सर्वांचे मनस्वी अभिनंदन !
वाचनिय अशीच संजय येरणे लिखीत कादंबरी. संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्ताने भरारी प्रकाशन नागभीड द्वारा नवखळा तह. नागभीड जि. चंद्रपूर येथे संताजी जगनाडे महाराजांची सावली यमुना संजय येरणे लिखित, शब्दांचे सामर्थ्य अधोरेखित करणा-या संतसूर्य संताजीच्या पत्नी यमुनेच्या जीवनचरित्रावरील जगातील पहिलीच कादंबरी प्रकाशित केली.
श्री संताजी प्रतिष्ठान कोथरूडचा 24 वा वर्धापन दिन संत गंगाराम लरलर सांस्कृतिक हॉल महातोबा मंदिरा जवळ कोथरूड पूणे 38 येथे उत्साहात साजरा झाला. यानिमित्त तिळगुळ समारंभ हळदीकुंकू विद्यार्थ्यांचा गुणगौरव मोफत आरोग्य तपासणी शिबीर होम मिनिस्टर स्नेहभोजनाचा कार्यक्रम 26 जानेवारी 2018 रोजी उत्साहात आणि आनंदात पार पाडला.
श्री संताजी पुरस्काराचे पुढे काय झाले ? बाळगंगाधर टिळक तेली तांबोळ्यांचे पुढारी नव्हते पुण्याच्या महापौरांनी सिद्ध केले ??
पुण्याचे कार्यक्षम नगरसेवक व माजी महापौर श्री. आबा बागुल यांच्या धडपडीतून शासकीय संस्थे मार्फत पुरस्कार देण्याचा पुणे महानगरपालिकेत ठराव झाला. पहिला पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक मा. आ. उल्हासदादा पवार यांना दिला. पण दिड वर्ष होवून सुद्धा साधे पुरस्काराचे नाव ही जाहीर झाले नाही.
श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुदुंबरे : आज रविवार दिनांक 28.1.2018 रोजी सदुंबरे येथे संस्थानचे अध्यक्ष मा.शिवदासशेठ ऊबाळे यांच्या अध्यक्षते खाली संस्थानची विशेष सर्वसाधारण सभा संपन्न झाली सभेसाठी विविध जिल्हयातून 50 हून अधिक समाज बांधव व भगीनी ऊपस्थीत होते.