देवगड : देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळाच्यावतीने देवगडमधील विविध शासकीय कार्यालयात संत जनगाडे महाराजांची प्रतिमा भेट स्वरूपात देवून जनगाडे महाराजांची जयंती शासनाच्या आदेशानुसार ८ डिसेंबर रोजी कार्यालयात साजरी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
तेली समाजोन्नती संघ, ता. चिपळुण व गुहागर, कार्यालय - वरळी, मुंबई-१८, आयोजित तेली उद्योजक मार्गदर्शन शिबिर तेली समाजातील मान्यवर उद्योजक आणि व्यवसायिक यांचा परिचय व्हावा व आपल्या सर्वांना त्यांच्या व्यवसायाची, उत्पादनाची माहिती मिळावी तसेच विद्यार्थी व तरुण वर्गाला प्रोत्साहन मिळावे व त्यातुनच उद्योजक घडावे, त्याचप्रमाणे समाजातील बंधु-भगिनी यांनाही याचा उपयोग व्हावा याकरिता आपल्या संघातर्फे सदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा ठाणे, अंबरनाथ वधु - वर फॉर्म
तेली सामज अंबरनाथ, जय संताजी सेवा मंडळ, अंबरनाथ आयोजित तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा रविवार दिनांक 5 जानेवरी 2020 रोजी सकाळी 10 ते सयं 5 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे. मेळाव्याचे स्थान सुर्येदय हॉल, साई सेक्शन, अंबरनाथ पुर्व आसे आहे. ज्या वधु वरा ना आपला फॉर्म भरावयाचा आसेल त्यांनी खालील फॉर्म भरून श्री. साईसागर फुलभंडार, श्री. सुरेश बबन झगडे (फुलवाले) दुकान नं. 81/ब, डी. एम. सी. रोड, रेल्वे स्टेशन समोर, अंबरनाथ (प.), जि. ठाणे, फोन नं. 0251-2685892 मो. नं. 8421967937 यापत्त्यावर पाठवावी
सांगली : कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रातील तेली समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळाल्यास समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगती होण्यास मदत होईल. समाजाचा पारंपरिक व्यवसाय इतिहासजमा होण्याच्या मार्गावर असताना स्वयंरोजगार मिळवून तरुणांनी स्वावलंबी होण्याची गरज आहे, असे मत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केले.
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती समाज मंडळाच्यावतीने गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी व समाजबांधवांचा सत्कार करण्यात आला. माध्यमिक परीक्षेत ९० टक्के व त्यापुढील तसेच उच्च माध्यमिक परीक्षेत ८० टक्क्यावरील विद्याथ्र्यांचा तसेच विविध स्पर्धा व क्षेत्रात चांगली कामगिरी करणाच्या समाजबांधवांचा सन्मान करण्यात आला.