Sant Santaji Maharaj Jagnade तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त बुधवार दि. १८ डिसेंबर २०१९, सकाळी १० ते २ पर्यंत, नंदीकेश्वर संस्थान, नंदीपेठ, आकोट या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी समाजातील महिलांचे सशक्तीकरण या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान तसेच तेली समाजातील उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजीत करण्यात आलेला आहे.
संगमेश्वर तेली समाज सेवा संघ, संगमेश्वर तालुक्याच्या वतीने, रविवार दि. १५ डिसेंबर २०१९ रोजी, सकाळी १०.०० वा. संगमेश्वर तालुका तेली समाज मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये तेली ज्ञाती समाजाच्या तालुका नुतन दिनदर्शिकेचे प्रकाशन व वितरण आणि महिला हळदीकुंकू होणार आहे. तरी सर्व समाज बांधवानी सदर कार्यक्रमास उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावा ही विनंती करण्यात आलेली आहे.
वरवेली - गुहागर तालुक्यातील वरवेली येथे तेली समाजाचे दैवत श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती वरवेलीग्रामपंचायत. जिल्हा परिषद शाळा, श्री काशी विश्वेश्वर मंदिर येथे संपन्न झाली. यावर्षी प्रथमच शासन आदेशानसार शासकीयनिमशासकीय कार्यलयात श्री संत संताजी महाराज यांची जयंती साजरी करण्याचे आदेश आल्याने सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी
सोयगांव येथील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यलयात राष्ट्रसंत संताजी महाराज जगनाडे यांनी जयंती साजरी करण्यात आली. पहिल्यांदाच शासकीय पातळीवर जयंती साजरी झाल्यामुळे तेली समाजामध्ये आनंदी आणि उत्साहाचे वातावरण होते. संध्याकाळी सालाबादप्रमाणे पालखी मिरवणूक काढण्यात आली.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा पालघर सल्गन श्री संताजी जगनाडे सेवा मंडळ विरार वसई पालघर, पालघर युवा मंच पालघर डहाणु बोईसर वाणगांव आयोजित राष्ट्रसंत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती दि. 08/12/2019 रोजी संध्या. ६ वाजता पालघर येथील कॉंग्रेस भुवन हॉल मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.