Sant Santaji Maharaj Jagnade
कणकवली, ता. २९ : खेडोपाडी वाहतुकीच्या साधनांची कमतरता, प्रसंगी पाच ते सात कि.मी. प्रवास करून शिक्षण घेणे अशा अनेक प्रतिकूल आव्हानांवर मात करून आपले धेय्य गाठणारी मुलेच भविष्य घडवतात, असे मार्गदर्शन मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनचे गोविंद कामतेकर यांनी केले.
पनवेल : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कोकण विभाग व जय संताजी तेली समाज मंडळ, पनवेल यांच्या वतीने टपाल नाका येथील श्री शनैश्वर मंदिर येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत ५१ जणांनी रक्तदान केले. या सर्वांना प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.
रत्नागिरी तालुका तेली समाज सेवा संघ (उप शाखा रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ) - तेली समाजाची अस्मिता संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून समाज जोडो रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या सर्व जिल्हयांतून या समाज जोडो रथयात्रेचा प्रवास होणार आहे. महा प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष मा.खा.रामदासजी तडस,
सालाबादप्रमाणे कोकण स्नेही ट्रस्टच्या समस्त सभासद, पालकांना कळविण्यात येते की २०२०-२१ ह्या शैक्षणिक वर्षात १० वी, १२ वी, पदवी, पदविका मिळविलेल्या आपल्या पाल्याची मार्कशीट (झेरॉक्स ) सेल्फ अटेस्टेड करुन मागच्या बाजूला पालकाचे नांव , पत्ता व फोन नंबर लिहून श्री . श्रीकृष्ण तळवडेकर, चिटणीस, फ्लॅट नं. ३२, पद्मावती सोसायटी, पद्मावतीदेवी मार्ग, आय.आय.टी. मार्केट, पवई, मुंबई ४०००७६ यांच्याकडे ३१ सप्टेंबर २०२१ पर्यंत पाठवावेत.
महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा प्रदेशाध्यक्ष खासदार श्री. रामदासजी तडस महासचिव डॉ.भूषणजी कर्डिले यांच्या आदेशानुसार महिला दिनानिमित्त ७ मार्च २०२१ रोजी दुपारी ३.०० वाजता zoom app वर महिला दिनाचं औचित्य साधून महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात करताना रायगड विभागीय महिला अध्यक्षा प्रियाताई डिंगोरकर यांना सर्वानूमते कार्यक्रमाचे अध्यक्षा बनविण्यात आले. नाशिक विभागीय महिला अध्यक्षा सौ. विद्याताई कर्पे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, महिलांची महिन्यातून एकदा अशी आँनलाईन सभा व्हावी असे मत मांडले.