सांगली : तेली समाजाच्या विविध समस्यांबाबत राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सांगली जिल्हा तेली समाज महासंघातर्फे बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय तेली समाजाचे युव सदस्य विजय संकपाळ यांनी बावनकुळे यांच्याशी चर्चा केली. समाजाच्या स्मशानभूमीपासून समाजमंदिरापर्यंत विविध प्रश्नांबाबत शासनपातळीवर सोडवणूक करावी, अशी मागणी त्यांनी केली.
सांगली : कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रातील तेली समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळाल्यास समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगती होण्यास मदत होईल. समाजाचा पारंपरिक व्यवसाय इतिहासजमा होण्याच्या मार्गावर असताना स्वयंरोजगार मिळवून तरुणांनी स्वावलंबी होण्याची गरज आहे, असे मत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केले.
पंढरपूर (प्रतिनिधी): पंढरपूर येथील लिंगायत तेली समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते,समाजाच्या कोणत्याही कार्यासाठी तन, मन, धनाने कार्य करणाऱ्या नागेश तुकाराम चिंचकर यांची नुकतीच महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडी च्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी, प्रांतिक सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड करण्यात आली.
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती समाज मंडळाच्यावतीने गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी व समाजबांधवांचा सत्कार करण्यात आला. माध्यमिक परीक्षेत ९० टक्के व त्यापुढील तसेच उच्च माध्यमिक परीक्षेत ८० टक्क्यावरील विद्याथ्र्यांचा तसेच विविध स्पर्धा व क्षेत्रात चांगली कामगिरी करणाच्या समाजबांधवांचा सन्मान करण्यात आला.
अंध विकास संस्थेस धान्यासह गणवेश द्यावा : श्रीविठ्ठल मंदिर समितीकडे मागणी
पंढरपूर - श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीकडून येथील अंध विकास संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी धान्य व गणवेश मिळावे, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेकडून मंदिर समितीला देण्यात आले.