पाटण, दि. १३ : दरवर्षीप्रमाणे सर्वसामान्य जनतेचे व भाविकांचे श्रद्धास्थान असलेले परमपूज्य संत श्री. संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी साई मंदिर, पाटण येथे भक्तिमय व भाविकांनी साध्या पद्धतीने व कोरोना संसर्गाचे असणारे नियम व अटींचे पालन करत पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला.
कोथरूड, दि. १ - मागील अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या श्री संताजी प्रतिष्ठानला हक्काची जागा मिळाली आणि कोथरूड परिसरात प्रतिष्ठानची इमारत उभी राहिली. त्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक व गटनेते पृथ्वीराज सुतार यांची साथ मिळाली. त्यामुळे सुतार यांच्या हस्ते श्री संताजी भवन या वास्तूचे उद्घाटन करण्यात आले.
लिंब : सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघटनेच्यावतीने पंचवीस हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री साहाय्यता निधीस देण्यात आला. कोरोनाच्या संकटात सापडलेल्या महाराष्ट्राला सावरण्यासाठी राज्यातील अनेक दानशूर व्यक्तींनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मोठी मदत होत आहे.
सप्टेंबर, तेली गल्ली 2009
भोसरी :- भोसरी तेली समजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मयुरी पॅलेस मंगल कार्यालयात दिनांक २/८/२००९ रोजी करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री. दिलीप फलटणकर - पाठ्य पुस्तक निर्मीती मंडळावरील सल्लागार व राष्ट्रपती पदक विजेते हे होते. लसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री. विष्णू जाधव - शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग, पिंपरी चिंचवड महानगर पालिका
सासवड येथील कावडे घराण्यास मानाने वागविले जाते. त्याच्या घराण्यातील मुळपुरुष भुत्या तेली' हा शंकराचा भक्त होता, घरातील मोठ्या मुलास 'बुवा' म्हणतात. त्याचे अंगावर सदैव काव लावून भगवी केलेली वस्त्रे असतात, यांचेजवळ तांब्याचे दोन मोठे रांजण बसविलेली शिडाची कावड असते. पुढील भागी महादेवाची पिंडी व नंदी असतो.