कोरेगाव तालुका तिळवण तेली समाजाच्या वतीने आज कोरेगाव येथे मा. आमदार श्री महेशजी शिंदे, कोरेगाव - खटाव - सातारा यांची कोरेगाव येथे शासकीय विश्रामगृहात समक्ष भेट घेतली समाजाची गेल्या काही वर्षापासूनची प्रमुख मागणी समाज मंदिरा साठी जागा व सभामंडप या दोन गोष्टी आमदार साहेबांपुढे मांडल्या गेल्या.
लातूर वीरशैव तेली समाजाच्या वतीने मा. ना. श्री अमित देशमुख साहेब ( पालक मंत्री तथा वैदकीय शिक्षण मंत्री,महाराष्ट्र राज्य) यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र चिकित्सा शिबीर आयोजित केले होते. आपण आपल्या समाजातील जेष्ठ नागरिकांना आव्हान केले होते. त्यानिमित्ताने आपल्यातील 18 जेष्ठ नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. त्यापैकी आज जगप्रसिद्ध डॉ. श्री तात्याराव लहाने साहेब यांच्या हस्ते मोतिबिंदु शस्त्रक्रिया खालील जेष्ठ बांधवांची करण्यात आली.
महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा लातूर जिल्ह्याच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली बसवेश्वर चौक येथे जाऊन महात्मा बसवेश्वर पुतळ्यास हार घालून व मानवंदना देऊन वाजत गाजत स्वागत करण्यात आले व त्यानंतर बसवेश्वर कॉलेज समोरील पुतळ्याचे हार घालून मानवंदना देण्यात आली त्याचप्रमाणे आझाद चौक येथे बाळ गोपाळ यांनी महात्मा बसवेश्वर जयंती साजरी
सांगली जिल्हा लिंगायत तेली समाज अंतर्गत मिरज शहर व मिरज तालुका लिंगायत तेली समाज यांच्या संयुक्त विद्यमाने भिव्य राज्यव्यापी लिंगायत तेली समाज वधू-वर मेळावा २०२२ महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सर्व लिंगायत तेली समाजातील ज्यांना बंधू-भगिनींना यंदा "कर्तव्य आहे. अशा इच्छुकाकरिता समाजातील जेष्ठांच्या आशिर्वादाने अनुरूप जोडीदार शोधण्यासाठी राज्यस्तरीय वधूवर व पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे तरी आपण सर्वजण उपस्थित राहून हा मेळावा यशस्वी करावा.
सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात विखुरलेल्या तेली समाजाने एकत्र यावे. एकजुट झाल्याशिवाय त्मचीआमची ताकद वाहणार नाही. एकट होईल तेव्हाच आपली प्रगती होईल असे प्रतिपादन संताजी महाराज देवस्थान, सुदंबरे, जि. पुणेचे अध्यक्ष शिवदास उबाळे यांनी केले.