गेवराई (प्रतिनिधी ) - तेली समाज तेल घाणा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पुणे या संस्थेच्या वतीने दि.११सप्टेंबर रोजी रविवार सकाळी ११ वा वीर बाजी पासलकर स्मारक सभागृह पुणे येथे तेली समाजातील तेल घाणा व्यवसाय करणाऱ्या समाज बांधवाचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रोहिदास उबाळे, सम्राट तेली ,कचरू वेळंजकर. किर्वे. निशाताई करपे, नानासाहेब चिलेकर,
बिबवेवाडी, दि. १८ - भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्द ल चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुणे तिळवण तेली समाजातर्फे नागरी सत्कार करण्यात आला. ज्ञानज्योती सावित्रीबाई सभागृह टिंबर मार्केट येथे हा सोहळा पार पडला. यावेळी घनश्याम वाळंजकर, प्रकाश कर्डिले, उमेश किरवे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी आमदार योगेश टिळेकर, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, दीपक मिसाळ, दत्ताजी खाडे अनेक मान्यवर उपस्थित होते.
कोरेगाव तालुका तिळवण तेली समाजाच्या वतीने आज कोरेगाव येथे मा. आमदार श्री महेशजी शिंदे, कोरेगाव - खटाव - सातारा यांची कोरेगाव येथे शासकीय विश्रामगृहात समक्ष भेट घेतली समाजाची गेल्या काही वर्षापासूनची प्रमुख मागणी समाज मंदिरा साठी जागा व सभामंडप या दोन गोष्टी आमदार साहेबांपुढे मांडल्या गेल्या.
लातूर वीरशैव तेली समाजाच्या वतीने मा. ना. श्री अमित देशमुख साहेब ( पालक मंत्री तथा वैदकीय शिक्षण मंत्री,महाराष्ट्र राज्य) यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र चिकित्सा शिबीर आयोजित केले होते. आपण आपल्या समाजातील जेष्ठ नागरिकांना आव्हान केले होते. त्यानिमित्ताने आपल्यातील 18 जेष्ठ नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. त्यापैकी आज जगप्रसिद्ध डॉ. श्री तात्याराव लहाने साहेब यांच्या हस्ते मोतिबिंदु शस्त्रक्रिया खालील जेष्ठ बांधवांची करण्यात आली.
महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा लातूर जिल्ह्याच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली बसवेश्वर चौक येथे जाऊन महात्मा बसवेश्वर पुतळ्यास हार घालून व मानवंदना देऊन वाजत गाजत स्वागत करण्यात आले व त्यानंतर बसवेश्वर कॉलेज समोरील पुतळ्याचे हार घालून मानवंदना देण्यात आली त्याचप्रमाणे आझाद चौक येथे बाळ गोपाळ यांनी महात्मा बसवेश्वर जयंती साजरी