महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, सातारा जिल्हा अंतर्गत श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था, महाराष्ट्र तसेच समस्त सातारा जिल्हा तेली समाज यांचे संयुक्त विद्यमाने आजोजित श्री संत संताजी जगनाडे महाराज रथयात्रा स्वागत मेळावा.
मोबाईल कॉम्प्युटरच्या डिजिटल गतिमान युगात माणूस माणसांना प्रत्यक्ष समोरा समोर असा भेटतच नाही. जो भेटतो, बोलतो तो फक्त मोबाईलवर, फेसबुकवर अन्य वायरलेस जिव्हाळालेस माध्यमातुन आणि म्हणून निदान आपल्या मुलांच्या भावी संसाराचा जोडीदार प्रत्यक्ष पहायला मिळावा. त्याचे आई-वडील, पालक, समोर विचारपुस करायला मिळावेत.
सांगली जिल्हा तेली समाज अंतर्गत, सांगली शहर तेली समाजाच्या वतीने शनिवार दि.१८ डिसेंबर २०२१ रोजी फल्ले मंगल कार्यालय सांगलीवाडी येथे भव्य राज्यस्तरीय लिंगायत तेली वधू-वर मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.तरी याचा सर्व तेली समाजातील गरजुनी लाभ घ्यावा व आपण आपल्या वधू-वरांसह उपस्थित राहावे ही विनंती सांगली जिल्हा तेली समाज समाजा तर्फे करण्यात आलेली आहे.
माढा - माढा तालुक्यात लाकडी घाण्याच्या तेलाच्या उद्योगाला युवकांच्या पुढाकारामुळे गती मिळत असून लाकडी घाण्याचे तेल वापरण्याचा ट्रेंडही लोकांमध्ये वाढताना दिसून येत आहे. अभियंत्यापासून अगदी शेतकऱ्यांच्या मुलांपर्यंत या उद्योगात लोक उतरलेले आहेत.
पाटण, दि. १३ : दरवर्षीप्रमाणे सर्वसामान्य जनतेचे व भाविकांचे श्रद्धास्थान असलेले परमपूज्य संत श्री. संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी साई मंदिर, पाटण येथे भक्तिमय व भाविकांनी साध्या पद्धतीने व कोरोना संसर्गाचे असणारे नियम व अटींचे पालन करत पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला.