वाल्हे, ता. २३ : श्री संत संताजी जगनाडे महाराज पालखी सोहळ्याचे सोमवारी सायंकाळी वाल्हे (ता. पुरंदर) येथे आगमन झाले. पालखी सोहळा तेली आळीमध्ये विसावला होता. मंगळवारी सकाळी पालखी सोहळा आळंदीच्या दिशेने मार्गस्थ झाला.
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे रोहयो व फलोत्पादन कॅबिनेट मंत्री व तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा ना जयदत्त आण्णा क्षीरसागर यांची मंत्री पदी निवड झाली बद्दल सातारा जिल्हा लिंगायत तेली समाजाचे वतीने मुबई मंत्रालय येथे सत्कार करण्यात आला व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. सातारा जिल्ह्यातील तेली समाजाचे विशेषतः गावोगावच्या स्मशानभूमीचे प्रश्न व विविध समस्या सोडविणे बाबत सकारात्मक चर्चा झाली.
महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेच्यावतीने कन्या दिवस साजरा
पंढरपूर : महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा पंढरपूर शहराध्यक्ष मधुकर फलटणकर, शहर कार्याध्यक्ष सागर पडगळ यांच्यावतीने दि. २१ जुलै रोजी जागतिक कन्या दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहीद कुणालगीर गोगावी अंध, अपंग निवासी शाळेमध्ये मुलांना कार्ड पेपर व मिष्टान्न भोजन देण्यात आले.
तेली समाजातील महान विभुती (भाग 7) -
सौ. अरूणा इंगवले, अध्यक्ष चिपळूण तालुका तेली समाज महिला आघाडी
मराठ्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार पन्हाळा किल्ला पेशवाईत ओस पडला. गडावर नवनाथांपैकी गहिनाथांनी काही दिवस वास्तव्य केले. ते ठिकाणही ओस पडले. एके दिवशी गहिनीनाथांनी त्यांचे शिष्य विश्वनाथ फल्ले यांच्या स्वप्नात येऊन त्यांना गडावर जाण्याची आज्ञा दिली.
तेली समाजातील महान विभुती (भाग 4) -
सौ. अरूणा इंगवले, अध्यक्ष चिपळूण तालुका तेली समाज महिला आघाडी
सातारा जिल्ह्यातील आरफळ गावी राऊत घराण्यात काळोजी महाराजांचा जन्म झाला. एके दिवशी ते घराबाहेर पडले आणि जरंडेश्वराच्या डोंगरावर जाऊन मारूतीची उपासना करू लागले. झाडपाला खाऊ न त्यांनी 12 वर्षे उपासना केली. आश्चर्य म्हणजे या काळात महाराजांना 3 इंच लांबीचे पुच्छ फुटले.