Sant Santaji Maharaj Jagnade
आज ८ डिसेंबर. ३९५ वी भगवद् भक्त जय श्री संताजी जगनाडे महाराज जयंती दौंड येथिल श्री विठ्ठल येथे सर्व समाजबांधव व भगिनींनी उपस्थित राहुन महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन आभिवादन केल.यावेळी जे काही दौंड शहर प्रशासकिय कार्यालयात ६ तारकेला छायाचित्रांच वाटप करण्यात आलं व जी.आर ची आम्मल बजावनी केली गेली
संत संताजी जगनाडे महाराज यांच्या 396 व्या जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांत (मालक) परिचारक, युवकांचे प्रेरणास्थान मा. श्री.प्रणव (मालक) परिचारक, मा.नगराध्यक्ष नागेशजी (काका) भोसले, विरपिता मा. श्री.मुन्नागिर (काका) गोसावी, नगरसेवक मा. श्रीनिवास बोरगांवकर, युवा नेते युवराज भाऊ भोसले
सांगली - स्मशानभूमी, समाज मंदिर यासह तेली समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या सोडवाव्यात, अशी मागणी जिल्हा तेली समाज महासंघाच्यावतीने रोहयो व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे करण्यात आली. तेली समाज महासंघाचे युवा सदस्य विजय संकपाळ यांच्या नेतृत्वाखाली समाज बांधवांनी क्षीरसागर यांची मुंबईत भेट घेतली. त्यांची मंत्रीपदी वर्णी लागल्याने जिल्हा तेली समाजाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
सांगली : तेली समाजाच्या विविध समस्यांबाबत राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सांगली जिल्हा तेली समाज महासंघातर्फे बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय तेली समाजाचे युव सदस्य विजय संकपाळ यांनी बावनकुळे यांच्याशी चर्चा केली. समाजाच्या स्मशानभूमीपासून समाजमंदिरापर्यंत विविध प्रश्नांबाबत शासनपातळीवर सोडवणूक करावी, अशी मागणी त्यांनी केली.
सांगली : कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रातील तेली समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळाल्यास समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगती होण्यास मदत होईल. समाजाचा पारंपरिक व्यवसाय इतिहासजमा होण्याच्या मार्गावर असताना स्वयंरोजगार मिळवून तरुणांनी स्वावलंबी होण्याची गरज आहे, असे मत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केले.