देवळी शहरातीला मिरननाथ मंदिरमध्ये श्री.संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची ३९६ वी जयंती विविधा सामाजिक संघटना व विविध पक्षाचे पदाधिकारी व देवळी तेली समाज यांच्यावतीने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करूना अभिवादन करण्यात आले.
नागपुर तेली समाज - संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्य जवाहर विद्यार्थी गृह नंदनवन येथे संताजी महाराज यांच्या पुतळ्याला महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभे च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माल्यार्पण करूण महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन पुजा अर्चणा केली.
.
मेहकर - येथील संताजी कॉन्व्हेंटमध्ये संताजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त संताजी महाराजांच्या मुर्तीचे पुष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात आले.
गडचांदूर:- गडचांदूर येथे संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. स्थानिक संताजी जगनाडे महाराज चौकात प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अशोकराव बावणे यांनी भूषविले. बंडू भाऊ वैरागडे यांचे हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.
कारंजा येथील श्री. संताजी क्रेडिट को-ऑप सोसायटी, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, शाखा कारंजा व श्री. संताजी सांस्कृतिक व सेवा मंडळाचे संयुक्त विद्यमाने तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री. संताजी जगनाडे महाराज यांची 396 वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी संताजी महाराजांच्या मुर्तीचे पुजन करण्यात आले.