Sant Santaji Maharaj Jagnade
नागपूर पासून पश्चिमेस चौदा मैलावर व्याहाड हे गांव वसलेले आहे. नागपूरहन अमरावतीस जाणार मोटारच्या सडकेवर हे गांव आहे.
नागपूर जिल्ह्यात तेली समाज मोठ्या प्रमाणात आहे. असे असूनही आम्हाला आमच्या संख्या बळाच्या तुलनेत लाभ मिळत नाहीत. जातीनिहाय जनगणनाच झाली नसल्याने शासनाला धोरण ठरविण्यातही अनेक अडचणी जातात. त्यामुळे जातीनिहाय जनगणना करावी, अशी आग्रही मागणी तेली समाज बांधवांनी केली. तेली समाजाची वाटचाल, समाजाला भेडसावणाऱ्या विविध समस्या, यशोगाथा यासह सांस्कृतिक महत्त्व आदी मुद्यांवर मंथन झाले.
नागपूर : विदर्भ तेली समाज महासंघाची स्थापना २६ नोव्हेंबर १९९४ रोजी झाली. मधुकरराव वाघमारे, विजय बाभुळकर यांच्या प्रयत्नातून हे संघटन उदयास आले. समाजातील कष्टकरी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि शैक्षणिक व सामाजिक विकासाच्या हेतूने महासंघ उदयास आला. नागपुरातील महासंघाचे कार्यालय राजे रघुर्जीनगर येथे आहे. महासंघाच्या माध्यमातून संघटनात्मक पद्धतीने शासनदरबारी अनेक विषयांवर लढे उभारण्यात आले.
विदर्भ तेली वर - वधु सुचक, नागपुर द्वारा समाज जागृती घडवत नि:शुल्क वधु -वर मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. या मेळाव्यात सर्व शैक्षणिक पात्रता आसलेल्या वधुवरानी तसेच तेली समाजातील सर्व शाखा व पोटशाखेतेल वधु वरांनी नाव नोंदनी करावी व समाजाला एकजुट करावे आसे आव्हान करण्यात आलेले आहे. मेळावा दिनांक 25 मार्च 2020 रोजी सकाळी 11.45 ते सायं 5.45 पर्यंत ना. बहेरे स्मृती सभागृह पावनभुमी ले - आऊट सोमलवाडा, वर्धा रोड, नागपुर येथे आयोजित होणार आहे
बाइक रॅलीने झाली कार्यक्रमाला सुरुवात - आमदार सहसरामजी कोरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला कार्यक्रम
देवरी 2 फेब्रुवारीला विदर्भ तेली समाज महासंघाच्या वतीने संत शिरोमणी जगनाडे महाराज जयंती महोत्सव कार्यक्रम संताजी मंगल कार्यालय देवरी येथे पार पडला, बाइक. रॅली काढून संपूर्ण देवरी शहरात समाजाची एकता व अखंडतेची जाणीव शहर वासीयांना झाली. बाल कलाकारांची नत्य स्पर्धा घेण्यातआली या स्पर्धेत क्रमांक पटकवणाऱ्या विद्याध्यांचे व गुणवंत विद्याथ्यांचे सत्कार व विशेष पुरष्कार देण्यात आले.