Sant Santaji Maharaj Jagnade
चंद्रपुर मूल तेली समाज - येथील बजाज शोरूमसमोर संत संताजी. जगनाडे महाराज जयंती माजी आमदार देवराव भांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मूल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम येनुरकर, अनिल मोगरे, दादाजी येरणे, नगरसेविका रेखा येरणे, शांताराम कामडे, डॉ. गोकुल कामडी, विजय भुरसे, विनोद आंबटकर आदी उपस्थित होते.
राज्य शासनाच्या अख्यातरीत येणाऱ्या सर्वच शासकीय कायालयात श्रीसंताजी जगनाडे महाराज जयंती साजरी करण्याबाबत परिपत्रक निघाले. त्याअनुशंगाने सर्व शासकीय कार्यालयात संत जगनाडे महाराज जयंतीचा कार्यक्रम व्हावा, यासाठी महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा, महिला आघाडीन पुढाकार घेतला आहे. श्रीसंताजी जगनाडे महाराज जयंती शासकीय/ निमशासकीय कार्यालयात साजरी करण्याबाबतचे परिपत्रक आणि प्रतिमा भेट देण्याचे कार्य समाजाने हाती घेतले आहे.
श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जन्मोत्सवा निमीत्य नागपूर महानगरपालिका नागपूर येथे संत जगनाडे महाराज यांच्या तैलचित्राचे अनावरण व माल्यार्पण नागपूर महानगरपालिका च्या उपमहापौर सौ मनीषा ताई कोठे स्थाई समिती अध्यक्ष श्री प्रदिप पोहाने यांच्या हस्ते दिनांक ८ डिसेंबर १९ छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकिय इमारत नागपूर महानगरपालिका येथे सपन्न झाला.
चंद्रपूर दि. ०८ : सन २०१९ मध्ये राष्ट्रपुरुष/थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरा करणे या कार्यक्रमांतर्गत संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती रविवार दि.८ डिसेंबर २०१९ रोजी आपल्या कार्यालयात व आपल्या अतिरिक्त सर्व कार्यालयात साजरी करण्यात यावी असे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. ज. पु. ति. २२१८/ प्र. क्र. १९५//२९ दि.२६ डिसेंबर २०१८ परिपत्र काढण्यात आले आहे.
वाशिम तेली समाज मुंगळा, ता. ९ : संताजी महाराजांना कीर्तन, प्रवचन श्रावणानाच्या आवडीमुळे संताजी महाराजांची व तुकाराम महाराजांची भेट १६४० साली झाली. संताजी महाराजांनी तुकाराम महाराजान गुरुस्थानी मानले होते. तुकाराम महाराजांची गाथा