Sant Santaji Maharaj Jagnade
चंद्रपुर - सर्व तेली समाज बांधवांना विनंती करण्या आसली आहे की तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचा जयंती महोत्सव दि. 7 डिसेंबर ते 8 डिसेंबर 2019 पर्यंत साजरा करण्यात येणार आहे. दिनांक 8 डिसेंबर रोजी रविववार दुपारी 4 वाजता, स्थळ श्री हनुमान मंदिर जय बजरंग क्रिडा संकुल च्या बाजुला, जुनोबा चौक बापुपेठ, चंद्रपुर, येथ तरी सर्व तेली समाज बांधवानी जास्ती जास्त संख्यने उपस्थित राहावे आसे आव्हान करण्यात आलेले आहे.
श्री संत जगनाडे महाराज तेली समाज जिल्हा बहुउद्देशिय संस्था, गडचिरोली, गडचिरोली आयोजीत महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा गडचिरोली जिल्हा, विदर्भ तेली समाज महासंघ, गडचिरोली, संताजी सोशल मंडळ, गडचिरोली, व तेली समाज, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने, श्री संत जगनाडे महाराज जयंती उत्सव व विदर्भ स्तरीय उप वर-वधू परिचय मेळावा, दिनांक १५ डिसेंबर २०१९ रोज रविवारला सकाळी ठिक ११.०० वाजता स्थळ : सुप्रभात मंगल कार्यालय, आरमोरी रोड, गडचिरोली
संताजी स्नेही मंडळ, तालुका चामोर्शी चे वतीने संत संताजी जगनाडे महाराज जयंती, निमित्य समाज प्रबोधन व किर्तन कार्यक्रम, दिनांक 0८ डिसेंबर २०१९ (रविवार) दुपारी १.०० वाजता, स्थळ : बाजार चौक, नगरपंचायत, चामोर्शी, अध्यक्ष - मान. प्रा. विलास निंबोरकर, गडचिरोली, प्रमुख वक्ते मान. प्रविनदादा देशमुख, सुप्रसिद्ध वक्ते, यवतमाळ (विषय : शेतीचे अर्थकारण, सरकारी धोरण व ओबीसी आरक्षण), किर्तनकार मान. इंजि. भाऊसाहेब थुटे , प्रसिद्ध प्रबोधनकार तथा सप्तखंजेरी वादक, वर्धा (सत्यपाल महाराज यांचे शिष्य)
तेली समाज बहुउद्देशिय संस्था, उमरखेड दरवर्षी तेली समाजबांधवा मार्फत राखीपौर्णिमेनिमित्त 'रक्षाबंधन झेंडा उत्सव' हा उपक्रम राबवत असते. तरी यावर्षीचे तेली समाज बांधव व समाजाचे उपाध्यक्ष - श्री. अविनाश विठ्ठलराव पोंगाणे हे रक्षाबंधन झेंडा उत्सवाचे मानकरी आहेत. यावर्षीचा झेंडा हा दिनांक १५/०८/२०१९ गुरुवार रोजी यांचे राहते घरुन सकाळी ८ वाजता झेंडा उत्सव दिंडी वसंतनगर ते हनुमान मंदीर, गांधी चौक पर्यंत निघणार आहे.
यवतमाळ खासदार रामदास तडस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रांतिक दैनिक महासभेचे कामकाज वेगाने संपूर्ण विदर्भात सुरू करण्यात आले असून नुकतीच यवतमाळ जिल्हा आघाडी स्वतः रामदास सदस्यांनी गठित केली असून जिल्हा अध्यक्ष पदावर दिलीप बारडे यांची नियुक्ती केली आहे. बारडे त्यांनी अन्य कार्यकारणी घोषित केली. त्यात कार्याध्यक्ष संतोष दशरथ डोमाळे, सचिव विजय बिजुलकर, कोषाध्यक्ष रमेश जयसिंगपूरे,