Sant Santaji Maharaj Jagnade
महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा हिंगणघाट व वर्धा जिल्हा द्वारा वर्धा लोकसभा निवडणुकीमध्ये सलग दुसऱ्यांदा विक्रमी मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील तेली समाजाचे लोकसभेमध्ये नेतृत्व करणारे एकमेव नवनिर्वाचित खासदार मा. श्री. रामदासजी तडस,अध्यक्ष, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा यांचा भव्य सत्कार सोहळा दिनांक 23-2-2019 रविवार दुपारी बारा वाजता हरिओम सभागृह हिंगणघाट इथे आयोजित करण्यात आलेला आहे.
काँग्रेसने तेली समाजाची थट्टा केली समाज काग्रेसला त्यांची जागा दाखवून देणार - गोपाळ पाटील
यवतमाळ दि. २६ - निवडणूक म्हटली की पक्षोपक्षीच्या राजकारणात जातीय समिकरण महत्वाचे ठरते. बिहार राजस्थान व गुजरात च्या खालोखाल महाराष्ट्रात ८० लाख तेली समाजाची लोकसंख्या आहे. तथापी एका सव्र्हेक्षणानुसार काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात एकाही ते ली समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी दिली नसल्याची माहीती प्राप्त झाली आहे. रडत कुंथत चंद्रपुर येथील लोकसभेकरीता बांगळे यांना तिकिट दिल्याचे अगोदर जाहीर झाले.
गोंदिया दांडेगांव परिसरात सर्व तेली समाज बांधवांच्या वतीने श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती दिनानिमीत्त दि. ३१-०३-२०१९ रोज रविवारला दांडेगांव, ता.जि.गोंदिया येथे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यास आलेले आहे. करिता सर्व तेली समाज बांधवांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. ही विनंती. सर्व तेली समाज बांधवाना करण्यातआलेली आहे. कार्यक्रम : रविवार दि. ३१-०३-२०१९ स्थळ : बस स्टॅण्ड जवळ, दांडेगांव, ता.जि.गोंदिया
श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी निमित्त मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन गुरुवार दिनांक 3 जानेवारी 2019 रोजी सायंकाळी सहा वाजता हनुमान मंदिर जटपुरा पंच तेली समाज चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आलेली आहे. तर गुरुवार दिनांक 3 जानेवारी 2019 रोजी दुपारी तीन वाजता श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
नागपूर : एरंडेल तेली समाज हितकारिणी मंडळाद्वारे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन महावीरनगर मैदानात करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात २५ जोडप्यांचा विवाह करण्यात आला. या कार्यक्रमाला महापौर नंदा जिचकार, आमदार कृष्णा खोपडे, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, माजी खासदार नाना पटोले, वर्धा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अतुल तराळे, माजी उपमहापौर शेखर सावरबांधे,