अहमदनगर : संतांचे विचार है आपले जीवन सुखी करण्यासाठी निर्माण केले गेले आहे. त्यांचे विचार आचरणात आणून आपण आपले जीवन सार्थकी लावले पाहिजे. संत श्री जगनाडे महाराज यांनी आपल्या कार्यातून समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शक तत्वावर तिळवण तेली समाज ट्रस्ट काम करुन समाजोन्नत्तीचे काम करत आहे. विविध उपक्रमातून समाजाची प्रगती साधत आहे.
राहाता : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, संताजी जगनाडे महाराज यांचे विचार आणि साहित्य हे प्रेरणादायी असून संतांनी कधीही कोणत्या एका समाजासाठी काम केले नाही. संतांनी नेहमी सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला, असे मनोगत राहाता नगरपालिकेच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा यांनी राहाता नगरपालिकेत बोलताना व्यक्त केले.
श्री संत संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव २०२१ कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. राम सावकार गोविंदराव सूर्यवंशी माजी उपनगराध्यक्ष नगर परिषद, लोहा, प्रमुख अतिथी मा.श्री.संत बाबा बलविंदरसिंघ जी गुरुद्वारा लंगर साहेब, कार्यक्रमाचे उद्घाटक मा.श्री.डॉ. विपीन ईटनकर साहेब (IAS) जिल्हाधिकारी, नांदेड, विशेष सत्कारमूर्ती मा.श्री. डॉ. प्राचार्य नागनाथ पाटील,
जवळे : संताजी जगनाडे महाराज यांची ३९७वी जयंती पारनेर तालुक्यातील जवळे येथील ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. ज्येष्ठ नागरिक मदन कृष्णाजी रत्नपारखी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
नागपूर : श्री संताजी स्मारक समितीद्वारे संत जगनाडे चौक नंदनवन नागपूर येथे ८ डिसेंबरला मोठ्या उत्साहात श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. जगनाडे महाराज यांचा ३९७ वा जन्मोत्सव ब्रह्ममुहुर्तावर सकाळी ६ वा. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. यशवंत खोब्रागडे व डॉ. गणेश मस्के यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला पंचामृताने स्नान करून विधिवत पूजा करण्यात आली.