Sant Santaji Maharaj Jagnade
आज दिनांक 24/12/21 तेली समाज महासंघ जिल्हा यवतमाळ चे वतीने श्री संताजी जगनाडे महाराज यांची रथ यात्रा यवतमाळ येथे आली असता तेली समाज महासंघाचे वतीने तेली समाजाची मुलुख तोफ गजूनाना शेलार यांचा सत्कार करण्यात आला असता श्री संताजी जगनाडे महाराज यांची प्रतिमा शाल श्रीफळ पुष्प देऊन सत्कार करण्यात आला संताजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त समाजातील मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच संताजी महाराज यांचे विचार बालमनावर रुजविण्यासाठी १० वर्ष ते १६ वर्ष वयोगटातील मुलां-मुलीसाठी "संत संताजी जगनाडे महाराज यांचे चरित्र" या विषयावर भव्य निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. तरी आपल्या पाल्यांचा सहभाग यात नोंदवावा.
तेली समाज संस्था, बाराभाटी / रेल्वे श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम दिनांक ०२ जानेवारी २०२२ रोज रविवारला स्थळ:- गंगाधरजा दशमुख याच्या घरासमोर व समाज मंदीराच्या भव्य आवारात सर्व तेली समाज बांधवाना निमंत्रित करण्यात येते की, तेली समाज संघटना,बाराभाटी च्या वतीने श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम आयोजित केला असून उपरोक्त कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.
पुसद : तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संताजी जगनाडे महाराज याची पालखी रथ यात्रा व प्रांतिक संघटनेचे नेते हे यवतमाळ येथे दि. २३ डिसेंबर २०२१ रोजी गुरुवारला सायंकाळी ६.०० वाजता प्रथमागमन करणार आहेत. या पालखी रथाचे व अतिथी नेत्याचे स्वागत लोहारा येथील श्री कमलेश्वर महादेव मंदिरात भव्य स्वरूपात करण्यासाठी समाज बांधवानी हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे यवतमाळ पालखीचा व समाज नेत्यांचा मुक्काम संताजी मंदिर येथे राहील.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा समाज जोडो अभियान अंतर्गत समाजमाता कै.केशरकाकू यांचे बीड नगरीत भव्य स्वांगत आ. संदिप क्षिरसागर आणि समाज बांधवांनी केले.समाजमाता माजी खासदार कै. केशरकाकू सोनाजीराव क्षिरसागर यांचे निवासस्थान संत संताजी महाराज पादुका व गाथाचे पूजन धार्मिक विधीने क्षिरसागर कुटुंबीया कडून करण्यात आले.