गडचिरोली : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे.अनेक संतांनी समाजाच्या उत्थानासाठी कार्य केले. संत संताजी जगनाडे महाराजांचे विचार आणि साहित्य हे प्रेरणादायी आहेत. संतांनी नेहमी सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला, असे प्रतिपादन विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. सुरेश रेवतकर यांनी केले.
धुळे - तेली समाजाचे संत श्रेष्ठ संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांचे ३९७ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्ष कैलास चौधरी, सचिव रवींद्र चौधरी, कार्याध्यक्ष मनोज चौधरी, शहर उपाध्यक्ष चंद्रकांत चौधरी, शहर सचिव राकेश चौधरी यांनी श्री संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. यावेळी वर्षभर चालणा-या जनजागृती प्रबोधन यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.
निमगाव केतकी - श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या ३७० व्या जयंतीनिमित्त निमगाव केतकी येथे अखिल तेली समाज संघटना व निमगाव केतकी येथील तिळवण तेली समाजाच्या वतीने सुवर्णयुग गणेश मंदिर ट्रस्ट मंदिरामध्ये श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शिर्डी - तेली समाजाचे आराध्य दैवत संतश्रेष्ठ श्री संताजी महाराज जगनाडे तेली यांच्या जयंती निमि त्त शिर्डी येथील वाचनालयात तेली समाजाचे सदगुरू श्रेष्ठ संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची ३९७ वी जयंती साजरी करण्यात आली. शिर्डी शहरातील जेष्ठ सम जि बांधव व प्रगतशील शेतकरी हभप यशवंतराव वाघचौरे यांचे हस्ते प्रतिमपूजन करण्यात आले
पारोळा : अभ्यास एवढा करा की, यशाने आकाशाला गवसणी घालता आली पाहिजे, असे प्रतिपादन माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केले.