बिलोली तेली समाज - तहसील कार्यालय बिलोली येथील माननीय नायब तहसीलदार श्री गोंड साहेब, माननीय गटविकास अधिकारी वर्ग-1 श्री नाईक साहेब व एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय येथे विस्तार अधिकारी श्री देवकते साहेब यांना संत संताजी जगनाडे महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली. दि.08 डिसेंबर रोजी सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात जयंती साजरी करण्याचे शासनाचे आदेश असून
वरवेली : तेली समाजाचे दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती ८ डिसेंबर रोजी साजरी होणार आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातही संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करावी असे म्हटले आहे. शासनाने घेतलेला निर्णय तेली बांधवांसाठी आनंददायी असल्याचे रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघाचे अध्यक्ष रघुवीर शेलार यांनी सांगितले.
केंद्रिय तेली सेवा संघ तर्फे संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९५ व्या जयंती निमित्य प्रबोधन एवं सुसंवाद रविवार दि. 08 डिसेंबर 2019, वेळ : सकाळी 10.00 वाजता स्थळ : राजीव गांधी सांस्कृतीक सभागृह, नंदनवन पाण्याच्या टाकी जवळ, नागपूर या ठिकाणी आयाोजीत करण्यात आलेला आहे. तेली समाजाचे आराध्य श्री संताजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंती निमित्य आयोजित
करमाळा येथे दिनांक 8/12/19 रोजी राष्ट्रसंत श्री संताजी जगनाडे महाराजांची 396 वी जयंती तहसील ऑफिस येथे तहसीलदार श्री समीर माने यांचे हस्ते साजरी करण्यात आली, तसेच करमाळा नगरपरिषद येथेही महाराजांची प्रतिमा देऊन त्यांची जयंती नगराध्यक्ष श्री वैभव जगताप यांच्या हस्ते साजरी करण्यात आली यावेळी मुख्याधिकारी सौ, विना पवार
विहामांडवा येथील श्री मारुती मंदिर येथे सकाळी साडेदहा वाजता संताजी जगनाडे महाराज यांची 395वी जयंती साजरी करण्यात आली यावेळी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व ज्येष्ठ महेंद्रकुमार सकलेच्या यांनी जगनाडे महाराज यांच्या जीवन चरित्रा विषयी माहिती दिली. यावेळी गावातील तंटामुक्ती अध्यक्ष कचरू दादा नवपुते, समाज सेवक ताराचंद अण्णा नवपुते,