Sant Santaji Maharaj Jagnade
![]()
कार्यरत विश्वस्त मंडळ २०१५
सर्व समाजबांधवांना कळविण्यात येते की, श्री संताजी ब्रिगेड, पुणे यांच्या वतीने पुणे जिल्ह्यातील समाजातील सर्व पदवीधर व प्रोफेशनल व्यक्तींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सर्व समाजबांधवांना आवाहन करण्यात येत आहे की, आपल्या कुटुंबातील डॉक्टर, वकील, इंजिनीअर, पोलीस खात्यातील, शासकीय अधिकारी इतर क्षेत्रातील उच्च पदावर नुकतीच नियुक्ती झालेल्यांची माहिती खालील मोबाईल क्रमांकांवर पाठवावी, त्यांचा उचित सन्मान आम्ही करू इच्छितो.
![]()
माऊलीच्या मुक्काम ज्या ज्या तळावर असेल तेव्हा ते वेळ काढून अनेक दिंड्यात जाऊन त्यांच्या प्रमुखांना भेटत ज्यांचा उल्लेख करावा अशा दिंड्या ह्या की, चांगा वटेश्वर, सोपान काका महाराज, चौरंगी महाराज या व इतर पालख्यांच्या नेते मंडळींनी मार्गदर्शन केले.
मीटिंगच्या ठरलेंल्या विषयावर चर्चा वगैरे होऊन मीटिंग संपणार तोच राऊत उभे राहिले. आपली आहे ती ओळख सांगितली. संताजी महाराज यांची पालखी आपल्या संस्थेद्वारे पंढरपूर येथे जावी. याबाबत कार्यकारिणीने विचार करावा. मग यावर चर्चा सुरू झाली. वारकर्यांची मते होती तशीच कार्यकारीणीची मते होती. सर्वांनी बहुमताने त्यानी मांडलेला ठराव फेटाळला. राऊतांना दु:ख झाले. ही आपली मंडळी, पण हीसुद्धा साथ देण्यास असमर्थ आहेत.
![]()
आपण पुढे होऊन पालखी सुरू कशी करावी. हा ध्यास लागला. लोणंदच्यापुढे जात असताना बरड येथे मुक्काम होता. बरड गाव छोटेच पण या गावात अर्जुनशेठ बरडकर ही धर्मात्मा असामी. हा एकटा माणूस लाखो माणसांना दोन्ही हातानी मदत करणार, वारकरी तृप्त होत. बरड येथे गेल्यावर अर्जुनशेठना सांगावे वाटले. पण कसे सांगावे आपण हे असे ! बरडकर हे असे ! त्यांना सांगावे, का न सांगावे याच विचारात सांगावयाचे राहून गेले.