Sant Santaji Maharaj Jagnade
शिवाजी क्षिरसागर, अध्यक्ष सेवा आघाडी
![]()
माझी सर्व नोकरी पोलिस खात्यात गेलेली अनेक जबाबदार्या पेलताना माणुस वाचता आला, माणुस समजला. माझा समाज तेली, मी एक तेली ही भावना जीवनभर जपलेली. या वाटेवर तेली महासभा भेटली, मा. खासदार तडस साहेब भेटले. रामदासजी हे एक पैलवान पैलवान हे जरा तापट आसतात. पण विदर्भ केसरी असलेले हे बांधव अतिशय शांत स्वभावाचे मला त्यांच्या जवळ वावरता आले व काम ही करता येते हे त्यांचे वैशिष्ठ.
तळेगाव दाभाडे :- साहित्य कला आणि सांस्कृतीक मंडळाचे विश्वस्त व अध्यक्ष व जेष्ठ कवी श्री. सहदेव मखामले यांच्या पाचव्या काव्य संग्रहाचे प्रकाशन शनीवार दि. ११/४/२०१५ रोजी डॉ. राम मनोहर लोहिया समाजवादी विद्यापीठ कोलकर कॉलनी तळेगाव दाभाडे येथे सायंकाळी ५.३० वाजता संपन्न होत आहे.
अहमदनगर - राहुरी तालुका खादी ग्रमोउद्योग संघाची २०१५ -२०२० ची संचालक मंडळाची पंचवार्षीक निवडणूक बिनविरोध झाली आहे.
रमेश सदाशिव भोज
आपल्या झंझावती शैलीचा ठसा उमटविणारे रामदासजी तडस साहेब होय आम्ही त्यांना साहेबच म्हणतो कारण ते आमचे अगोदरही साहेबच होते आताही आहेत आणि भविष्यात अनंत कालापर्यंत साहेबच रहाणार आहेत. हे अगदी त्रिवार सत्य आहे. कारण पुर्वीनपासुनच त्यांचे आशिर्वाद आमच्या पाठीशाी आहेत. ते आपल्या समाजात जन्मले हे आपल्या समाजाचे भाग्यच म्हणावे लागेल, त्यांचा परिसस्पर्शा समाजाला झाला आणि संपुर्ण तेली समाजाचे भाग्यच उजाळले असे म्हणण्यातकाहीच वावगे ठरणार नाही. स्वत:च्या बुद्धीमत्तेच्या जोरावर सर्वच क्षेत्रात उत्तम प्रकारे कार्य करून अनेक समाज बांधवांना त्यांनी सर्व प्रकारची मदतच केली आहे. त्यांच्यामुळेच आपल्या तेली समाजाचे नाव संपुर्ण देशात सध्यातरी निघत आहे. यांच्यामुळेच आपला समाज नावारूपाला आलेला आहे. त्याचे कारण म्हणजेच साहेबांचे आपल्या समाजावरील प्रेम त्यांचे आशिर्वाद त्यांचे सहकार्य.
देवळी नगरपालीकेचे नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार व आज खासदार हा त्यांचा राजकीय प्रवास. सामाजीक प्रवास म्हणजे सलग १५ वर्ष तेली महासभा प्रांतिक अध्यक्ष. ते अध्यक्ष झाले तेंव्हा विदर्भ व मराठवाडा येथेच काम सुरू होते. परंतू त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला कार्यकर्त्यांना व समाजाला विश्वास दिला. आपल्या शाखा, आपल्या पोटशाखा मतभेद, आर्थिक भेद हे बाजुला ठेवू, एक तेली म्हणुन एकत्र येऊ उच्चवर्णीय जे एकत्र येतात. ते याच भुमीकेतुन तसे एकत्र येण्यास जरूर उशीर झाला पण आपण. लवकरच सावध होवू. ही जिद्द उरात ठेवून त्यांनी समाज घडविला. हे सर्वांना मान्य करावे लागेल कार्यकर्ते विश्वास ही त्यांची साठवण आहे.