Sant Santaji Maharaj Jagnade
महाराष्ट्र तेली महासभेने विश्वास दिला म्हणुन उभा राहिलो पदाधिकारी नेमून त्यांना दिशा ही दिली. परंतु समाजात जाताना त्या बांधवांचे अनेक प्रश्न कारण या पुर्वी काहींनी त्यांना अनुभव चांगले दिलेच नव्हते. त्यामुळे ती त्यांची चुक नव्हती . तर त्यांचे सत्य मत बरोबर होते. या मंडळींना कृतीतुन विश्वास दिला. पुस्तक मुद्रित करण्यासाठी गोळा झालेला निधी ज्ञानराज पतसंस्थेत मुदत ठेवीत जमा केला.
कोथरूड येथील शुभेच्छा मंगल कार्यालयात श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूडच्या वतीने नुकताच तिळगुळ व हळदी-कुंकू तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते २०१५ दिनदर्शिकेचे प्रकाशनही करण्यात आले. संस्थेच्या वतीने वर्षभर विविध समाजिक उपक्रम राबविले जाता.
आशा जागृत तालुक्याची जबाबदारी श्री. ज्ञानेश्वर दुर्गुडे श्री. किसनराव अवसरे, बळीराम धोत्रे यांच्याकडे आली. श्री. दुर्गुडे यांनी तालुक्यातील परंपरेला साजेसे कार्य सुरू केले. सलग दोन वर्ष विद्यार्थी गुण गौरप समारंभ घेऊन संघटन जिव्हाळा निर्माण केला. या बळावर ते खाने समुरी करू लागले.
पेण :- येथिल तेली समाज सेविका सौ. चंपाबाई उर्फ मंगला वैरागी यांचे पनवेल येथे दि. १०/१/२०१५ रोजी हृदय विकराने वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. भाव, भावना व अभिव्यक्ती यांचा सुरेख संगम असणार्या सौ. चंपाबाई यांचे जन्मग्राम पनवेल असुन येथील प्रसिद्ध पन्हाळे कुटूंबातील स्व. आबासाहेब पन्हाळे, माजी पनवेल नगरपालिका अध्यक्ष आणि माजी जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष यांची ती पुतणी होती.
शिरवळ, सातारा - मधील श्री संताजी महाराज तेली महिला बचत गट व श्री संत जगनाडे महाराज तेली महिला बचत गट यांच्या मार्फत शिरवळमध्ये श्री संताजी महाराज पुण्यतिथी सजारी करण्यात आली. यामध्ये समाजातील सर्व महिला व तरुण वर्ग सहभागी झाली होती.