अकोला, ता. ८ : तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचा जंयती उत्सव गुरुवार, ता. ८ डिसेंबरला राठोड पंच बंगला शिवाजीनगर अकोला येथे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
दि. ८ पिंपरी - चिंचवड महापालिकेच्या वतीने संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
शिर्डी - संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या ३९८ व्या जयंतीनिमित्ताने शिर्डी शहर तेली समाज व शिर्डी नगरपरिषद शिर्डी यांच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मंदिर शिर्डी येथे सकाळी ९:०० वाजता अभिषेक पूजा दिलीप भाऊ राऊत व सौ आशाताई राऊत यांच्या हस्ते संपन्न झाली तर सकाळी १०:३० वाजता शिर्डी नगर परिषदेत मध्ये मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे साहेब
उस्मानाबादः संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती गुरुवारी (दि.८) जिल्ह्यात विविध ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली. उस्मानाबाद शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोरील संताजी जगनाडे महाराज चौकात जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे आ. कैलास पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर,
नगर महाराष्ट्राला अनेक संतांची मोठी परंपरा आहे, या संतांनी आपल्या त्यागातून समाजाला जागृत करून दिशा देण्याचे काम केले आहे. संत संताजी महाराजांनी आपला प्रपंच, व्यवसाय आणि समाज यात उत्तम संतुलन साधत समाजोन्नत्तीचे काम केले त्यांचे विचार आणि कार्य आजही आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांचे विचार जीवनात प्रत्येकाने अंगीकारले पाहिजे.