प्रतिवर्षानुसार इस वर्ष भी जिला साहू संघ रायपुर ग्रामीण के तत्वाधान में साहू समाज युवक-युवती परिचय सम्मेलन एवं नवनिर्मित भवन का लोकार्पण कार्यक्रम का आयोजन रखा गया है । कार्यक्रम के - मुख्य अतिथि मान. श्री अरुण साव जी उप मुख्यमंत्री, छत्तीसगढ़ शासन, अध्यक्षता मान. श्री टहल साहू जी अध्यक्ष-प्रदेश साहू संघ छ.ग.
तेली समाज संस्था गोंदिया द्वारा आयोजित हळदी कुंकू कार्यक्रम व वर-वधु परिचय सम्मेलन तेली समाज संस्था गोंदिया व विदर्भ तेली समाज महासंघाच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम (महिलासांठी) व वर-वधु परिचय सम्मेलन दि. २८/०१/२०२४ रोज रविवार ला सकाळी ११ वाजे पासुन आयोजित केले आहे.
संत श्री जगनाडे महाराज तेली समाज संघटना व्दारा आयोजीत श्री संताजी जगनाडे महाराज स्मृती सोहळा उपवर - वधु परिचय मेळावा, महीलांचा हळदीकुंकू कार्यक्रम, समाज प्रबोधन गुणवंतांचा सत्कार सोहळा दिनांक : २० व २१ जानेवारी शनिवार व रविवार स्थळ : मधून सभागृह, भंडारा - नागपूर रोड, ठाणा (पे. पंप), ता. जि. भंडारा.
संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी तिळवण तेली समाज बांधवांच्या पुढाकारातून बुधवारी राशीन येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केल्यानंतर रामराजे भोसले महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अकोला : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अकोला जिल्ह्याच्या वतीने मंगळवार, दि. ९ जानेवारी रोजी तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त डाबकी रोड येथील ज्ञानेश्वर मंदिरात अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.