Sant Santaji Maharaj Jagnade
सर्व तेली समाज बांधवांना सूचित करण्यात येते की श्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त दिनाक:-०७-१२-२०१९ सकाळी 11 वाजता महाआरोग्य शिबिर ठेवण्यात आले आहे तरी सर्व समाज बांधवांनी शिबिराचा लाभ घ्यावा हीच नम्र विनंती. दिनाक:-०७-१२-२०१९ स्थळ:- तेली समाजाच्या जागेवर हनुमान मंदिर जवळ जुनोणा चौक बाबुपेठ, चंद्रपूर
देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळ, देवगड आयोजित संत जगनाडे महाराज जयंती उत्सव, रविवार, दि. 08/12/2019 रोजी तळेबाजार (अस्मिता निवास) सकाळी ठिक 10.00 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचे स्वरूप श्री. संत श्रेष्ठ जगनाडे महाराज जयंती, दिपप्रज्वलन, प्रतिमा पुजन व नमन, नुन कार्यकारीणी सदस्यांचे, सभासद व कर्तुत्वाचा सत्कार,
संत संताजी अध्यासन - तेली समाज
श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त, पुजन, महाआरती दि.08/12/2019 रविवार. चंद्र नगर, जुना पारडी नाका, येथे आयोजित केलेला आहे. तरी या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून माननीय कार्यसम्राट आमदार कृष्णा भाऊ खोपडे, स्थायी समिती अध्यक्ष नागपूर महानगरपालिका प्रदीपजी पोहाणे, संताजी सभागृह चे अध्यक्ष माननीय बाबुरावजी वंजारी,
भुसावळ - तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती ८ डिसेंबरला सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने सर्व विभागांना दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भुसावळात तेली समाजातर्फे शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये संताजी महाराजांची प्रतिमा व शासननिर्णयाची प्रत भेट म्हणून देण्यात आली.
श्री. संताजी महाराज तिळवण तेली समाज धर्मशाळा, पैठण तर्फे श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंती निमित्त विविध पैठण येथील विविध शासकीय कार्यालयाना श्री. संत संताजी महाराज जगानाडे यांची प्रतिमा व श्री. संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती साजरी करण्याच्या जिआर ची शाासकीय प्रत देण्यात आली. या प्रसंगी अध्यक्ष विक्रम हरिभाऊ सर्जे, उपाध्यक्ष केदारनाथ दादाराव सर्जे, कोषाध्यक्ष यशवंतराव नाथुजी बरकसे, सचिव भगवान कोंडीराम मिटकर तसेच इतर कार्यकर्ते देखिल मोठ्या संख्येने उपस्थित होते.