Sant Santaji Maharaj Jagnade
दिनांक 8-5/2016 या दिवशी कणकवली येथे संताजी महाराज चौकाचे नामकरण संपन्न झाले.
कणकवली तेथे समाजाच्या प्रयत्नातुन कनकवली नगर परिषदेच्या संमतीने तेली आळी येथे, मा. श्री. जनार्दन गोपाळ जगनाडे (अध्यक्ष श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे ) यांच्या शुभ हस्ते. श्री. संत शिरोमणी संताजी महाराज चौक नामकरण सोहळा पार पडला.
दिनांक ०८ जानेवारी २०१६ श्री संताजी जगनाडे महाराज ह्यांची ३१६ वी पुण्यतिथी निमित्त कोकण मराठी साहित्य परिषद, शूर्परक शाखेतर्फे शाखेचे अध्यक्ष तसेच आपल्या श्री संताजी जगनाडे सेवा मंडळ "तेली समाज", वसई-विरार-पालघर चे कार्याध्यक्ष मा. श्री. रमाकांत वाकचौडे (बापू) ह्यांनी आज त्यांच्या नालासोपारा पश्चिम सभागृहामध्ये साजरी केली, तद्वेळी सदर कार्यक्रमास को. म. सा. प., शुर्पारक शाखेचे कार्यकारिणी सदस्य व आपल्या मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. भगवान बोरसे, सचिव श्री. वैभव झगडे, सल्लागार श्री नामदे गुरुजी, श्री जाधव सर, को. म. सा. प., शुर्पारक शाखेचे सदस्य आणि मंडळाचे कार्यकारिणी सदस्य कु. आशिष रसाळ, श्री साखरकर साहेब, महिला अध्यक्षा सौ पुष्पा बोरसे, सौ सौंदळकर मामी, सौ साखरकर मॅडम हे कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
*श्री. संताजी सहाय्यक संघ, ठाणे* *(नोंदणीकृत तेली समाज संस्था)*
*जय संताजी ...*
आपल्या संस्थेच्या विद्यमाने *रविवार, दि. १३ नोव्हेंबर, २०१६* रोजी *श्री. मावळी मंडळ सभागृह, गणेश चित्रपट गृहाजवळ, चरई, ठाणे (प)* येथे *"राज्यस्तरीय वधु-वर-पालक परिचय मेळावा"* आयोजित करण्यात आला आहे. *हा मेळावा तेली समाजातील सर्व पोटजाती, अपंग, घटस्फोटीत, विधवा-विधुर या सर्वांसाठी खुला आहे.*
सदर मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणा-या वधु-वर-पालक, समाज बांधव, जाहिरातदार व दानशुर व्यक्तिंनी संस्थेच्या पदाधिका-यांशी संपर्क साधावा.
*संपर्कासाठी मोबाईल क्रमांक खालीलप्रमाणे;*
दिनांक 7-5-2016 या दिवशी श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात समस्त तेली बांधव व हित चिंतकांचे कल्याणार्थ लघुरूद्र पुजा श्री. जनार्दन जगनाडे व सतिश वैरागी यांच्या उपस्थितीत स्थानीक कार्यकर्ते व महिला भगीनींनी पुजा केली. तेली जिल्हा अध्यक्ष एकनाथ तेली यांनी आरती केली व नंतर सर्वांनी एकनाथ तेली यांच्या वतीने महाप्रसाद भोजनांचा लाभ घेतला (कुणकेश्वर मंदिर पौराणीक व समुद्र किनार्यावरील पर्यटन क्षेत्र आहे.)
तेली बांधवांसाठी आरोग्य शिबीर संपन्न
दिंनाक 8-5-2016 या दिवशी तळेबाजार येथे माधवबाग कणकवली, सिंधुदुर्ग यांचे मार्फत डॉ. पल्लवी पाटील यांच्या सहकार्याने तमाम तेली बांधवांसाठी आरोग्य शिबीर संपन्न झाले. समस्त समाज बांधवांनी याचा लाभ घेतला.