नंदुरबार येथील कन्या असलेल्या प्रसिध्द उद्योजिका तथा झेप फाऊंडेशन व भारताच्या ग्लोबल वेलनेसच्या राजदूत डॉ.रेखा चौधरी यांनी लिहिलेल्या इंडिया एन्शेंट लेगसी ऑफ वेलनेस या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच डॉ.रेखा चौधरी यांच्या लिखीत पुस्तिकेची पंतप्रधानांच्या ट्रिटर टीमने दखल घेतली आहे.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा धुळे शहराच्या वतीने श्री संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज यांच्या 397 वी जयंती निमित्त विविध कार्यक्रम मा श्री नरेंद्र चौधरी युवा आघाडी महासचिव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले. माननीय जिल्हा अध्यक्ष श्री कैलास काळू चौधरी व श्री युवा आघाडी अध्यक्ष श्री दिनेश दादा बागुल यांच्या धुळे जिल्हा अध्यक्ष स्थानी कार्यक्रमात केले तसेच
तेली समाज विवाह व सांस्कृतिक मंडळ, यवतमाळ द्वारा आयोजित तेली समाजातील सर्व शाखीय उप वधुवर मुला-मुलींची परीचय पुस्तिका “शुभ मंगलम” चे प्रकाशन रविवार दि. २३ जानेवारी २०२२ , वेळ : सकाळी ११ वा. स्थळ : श्री संताजी मंदिर, संकट मोचन रोड, यवतमाळ येथे आयोजित करण्यात आलेले आहे.
अहमदनगर : संतांचे विचार है आपले जीवन सुखी करण्यासाठी निर्माण केले गेले आहे. त्यांचे विचार आचरणात आणून आपण आपले जीवन सार्थकी लावले पाहिजे. संत श्री जगनाडे महाराज यांनी आपल्या कार्यातून समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शक तत्वावर तिळवण तेली समाज ट्रस्ट काम करुन समाजोन्नत्तीचे काम करत आहे. विविध उपक्रमातून समाजाची प्रगती साधत आहे.
राहाता : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, संताजी जगनाडे महाराज यांचे विचार आणि साहित्य हे प्रेरणादायी असून संतांनी कधीही कोणत्या एका समाजासाठी काम केले नाही. संतांनी नेहमी सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला, असे मनोगत राहाता नगरपालिकेच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा यांनी राहाता नगरपालिकेत बोलताना व्यक्त केले.