Sant Santaji Maharaj Jagnade
तेली समाज उपवर-वधू वर परिचय मेळावा, तेल्हारा जि.अकोला. रविवार दि.२ डिसेंबर २०१८ वेळ: सकाळी १० ते सायं.५ पर्यंत स्थळ : अनंतराव भागवत मंगल कार्यालय,भागवत वाडी,तेल्हारा आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की,दरवर्षी प्रमाणे यावर्षीही उपवर वधु परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व समाज बांधवांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती करण्यात आलेली आहे.
पैठण : जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांची गाथा संकलन करणारे तिळवण तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्या निमित्त तिळवण तेली समाज पैठणच्या वतीने ह.भ.प.भाऊसाहेब महाराज जोशी यांच्या अमृततुल्य वाणीतून दिनांक ३ जानेवारी पासून पद्मपुराण कथेला प्रारंभ झाला असून दि. १० जानेवारी ला शोभायात्रा मिरवणूक व ह.भ.प.रखमाजी महाराज नवले यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता होणार आहे
संत जगनाडे महाराजांची जयंती शासन स्तरावर खा. तडस यांनी लावून धरली होती संताजींच्या जयंतीची मागणी
अकोला - तैलीक समाजाचे आराध्य दैवत म्हणून ओळख असलेल्या संत जगनाडे महाराज (संताजी) यांची जयंती पुढील वर्षांपासून सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्येही साजरी केली जाणार आहे. राज्य शासनाने दोन दिवसांआधीच याबाबतचे परिपत्रक जारी केले. विशेष असे की ज्या दिवशी मागणी, त्याच दिवशी निर्णय एवढी तत्परता याकामी दाखविण्यात आली आहे.
धुळे : सोशल मिडीयाचा वापर अलीकडे वाढल्यामुळे प्रत्येकजण अनेक Whatsapp ग्रुपशी जोडलेला आहे. परंतु, अनेक ग्रुपमधील संदेश हे ब-याचदा निरुपयोगी असतात. त्यामुळे हे ग्रुप असून नसल्यासारखे किंवा निव्वळ 'टाईमपास' ठरतात. परंतु, दोंडाईचा येथील प्रकाश चौधरी यांनी Whatsapp ग्रुपचा विधायक वापर करत समाजबांधवांना एकत्र करण्याचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत त्यांनी या ग्रुपमध्ये महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेशातील एकूण २०८ गावे जोडली आहेत.
२५ डिसेंबर । नरखेड: संताजी मंदिर, नरखेड येथे संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विधीवत पुजना, आरती व माल्यार्पण करून मान्यवरांचे हस्ते महाराजांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवी देवरावजी टेकाडे, विशेष अतिथी खासदार कृपाल तुमाने, मुख्याधिकारी शेखर गुल्हाने, डॉ.महेंद्र धावडे,