यवतमाळ - तेली समाज विवाह व सांस्कृतीक मंडळ यवतमाळ रजि नं.१७९ द्वारे दिनांक २० जानेवारी २०१९ ला संताजी मंदिर संकट मोचन रोड यवतमाळ येथील भाषणात सकाळी ११ वाजता पासून सर्व शाखीय तेली समाजाच्या उप वधु वर परिचय मेळाव्याचे मोठ्या थाटामाटात आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात उप वधु वर परिचय पुस्तीकचे प्रकाशन सुध्दा मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
समस्त तेली पंचमंडळ चाळीसगाव जिल्हा जळगाव च्या वतीने श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह. मूर्तीपूजन दिनांक 30/12/2018 रविवार रोजी सकाळी आठ वाजता ठिकाणी संताजी मंदिर चाळीसगाव. किर्तन सप्ताह दिनांक 30/12/2018 ते 6/1/2019 रात्री 9 ते 11 महाप्रसाद दिनांक 6/1/2019 रविवार सकाळी अकरा ते तीन पर्यंत संपन्न होईल.
उस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्हा तेली समाज सेवाभावी संघ शाखा कळंब च्या वतीने आज कळंब शहरात संताजी जगनाडे महाराज यांची ३९५ वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी समाजाचे जिल्हाअध्यक्ष रवि कोरे आळणीकर,जेष्ठ मार्गदर्शक तथा माजी जि प सदस्य कोंडाप्पा कोरे ,जिल्हा कोषाध्यक्ष महादेव मेंगले,उस्मानाबाद तालुकाध्यक्ष दत्ताञय बेगमपुरे,सुर्यकांत चौधरी आदि
इ. स. १७७५ ते १७९० या कालावधीत महीपतीबाबा ताहराबादकर (कांबळे) यांनी भक्तिविजय, संतलीलामृत, भक्तलीलामृत आदी संतचरित्रे लिहिलेली आहेत. त्यांनी एकूण २८४ संतांची चरित्रे लिहिलीत. त्यात तुकोबाराय व त्यांचे संतसांगाती संताजी जगनाडे यांच्या कार्याची प्रगल्भता सुंदर वर्णन केलेली आहे.
संतांच्या साहित्याविषयी व संतांविषयी मराठी माणसाच्या मनात अपार प्रेम आहे. केवळ प्रेमच नाही, तर आदरही आहे. श्रद्धा व प्रेम जतन केलेले आहे. संतचरित्र परमपवित्र असतात.
या मंदिराच्या स्थापनेमागेही आख्यायिका आहे. तेली समाजाचे श्री संत कडोजी महाराज मंदिरातील गादीचे आठवे वारसदार शांताराम महाराज भगत यांनी ही आख्यायिका सांगितली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीसंत कडोजी महाराज दरवर्षी विठ्ठलचे दर्शन घेण्यासाठी पायी वारी करत असत. एकदा ते कार्तिक शुध्द एकादशीला पंढरपूरला निघाले असता वाटेतच त्यांना पांडुरंगाचा साक्षात्कार झाला.