Sant Santaji Maharaj Jagnade
श्री संताजी सेवा मंडळ भंडारा द्वारा आयोजित भंडारा तेली समाज वधु वर परिचय मेळावा 2018. तेली समाजातील सदर वधू वर दिनांक 25 11 2018 रोजी रविवार सकाळी अकरा वाजल्यापासून स्थळ संताजी मंगल कार्यालय जैल रोड पाण्याची टाकी जवळ भंडारा किती होईल. समाजातील वधु-वरांची नोंदणी फॉर्म कार्यालयात निशुल्क उपलब्ध होतील. तेली समाजातील समाजातील सर्व बांधवांना ही निवेदन करण्यात आले आहे
वैरागड : समाजाची सामाजिक, राजकीय व आर्थिक प्रगती करायची असेल तर तर तेली समाजाने पोटजातीचे जोखड तोडून हुंडा देणे व घेण्यासारखी कुप्रथा कालबाह्य करावी, तेव्हाच समाजाचा विकास शक्य आहे, असा सूर मान्यवरांनी काढला. येथील संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी व तेली समाज मेळावा आयोजित करण्यात आला होता. सोहळ्याचे उद्घाटन बबनराव फंड यांच्या हस्ते करण्यात आले.
तेली समाज उपवर-वधू वर परिचय मेळावा, तेल्हारा जि.अकोला. रविवार दि.२ डिसेंबर २०१८ वेळ: सकाळी १० ते सायं.५ पर्यंत स्थळ : अनंतराव भागवत मंगल कार्यालय,भागवत वाडी,तेल्हारा आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की,दरवर्षी प्रमाणे यावर्षीही उपवर वधु परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व समाज बांधवांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती करण्यात आलेली आहे.
पैठण : जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांची गाथा संकलन करणारे तिळवण तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्या निमित्त तिळवण तेली समाज पैठणच्या वतीने ह.भ.प.भाऊसाहेब महाराज जोशी यांच्या अमृततुल्य वाणीतून दिनांक ३ जानेवारी पासून पद्मपुराण कथेला प्रारंभ झाला असून दि. १० जानेवारी ला शोभायात्रा मिरवणूक व ह.भ.प.रखमाजी महाराज नवले यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता होणार आहे
संत जगनाडे महाराजांची जयंती शासन स्तरावर खा. तडस यांनी लावून धरली होती संताजींच्या जयंतीची मागणी
अकोला - तैलीक समाजाचे आराध्य दैवत म्हणून ओळख असलेल्या संत जगनाडे महाराज (संताजी) यांची जयंती पुढील वर्षांपासून सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्येही साजरी केली जाणार आहे. राज्य शासनाने दोन दिवसांआधीच याबाबतचे परिपत्रक जारी केले. विशेष असे की ज्या दिवशी मागणी, त्याच दिवशी निर्णय एवढी तत्परता याकामी दाखविण्यात आली आहे.