इंदिरानगर - येथील कलानगर परिसरातील संताजी समाजमंदिरात संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराजांची ३९८ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी संत शिरोमणी श्री संताजी महाराजांच्या मूर्तीचे इंदिरानगर तेली समाजाचे अध्यक्ष मनोज कर्पे यांच्या हस्ते सपत्नीक पूजन करण्यात आले. त्यानंतर अभिषेक व आरती झाली. यावेळी मान्यवरांनी मूर्तीस पुष्पहार व पुष्पगुच्छ अर्पण केले.
रविवार, दि १८ डिसेंबर २०२२ सकाळी १०.०० वा • स्थळ श्री संत संताजी जगनाडे महाराज स्मारक जगनाडे चौक, ग्रेट नाग रोड, नंदनवन, नागपूर- ९. संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी पर्वावर महाराष्ट्र शासनाद्वारे श्री संताजी आर्ट गॅलरी हा प्रकल्प रक्कम (रु.६,२७,००,०००/-) नागपूर सुधार प्रन्यासद्वारा बांधकामास सुरुवात होत असुन या भुमीपुजन सोहळ्यास समाज बांधवांना आमंत्री केले आहे.
चांदवड शहरात श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचा ३९८ वा जयंती सोहळा साजरा करण्यात आला. प्रारंभी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ समाजबांधव जगन्नाथ राऊत, अध्यक्ष रमेश जाधव, उपाध्यक्ष गणेश वाघ यांच्या हस्ते करण्यात येऊन संताजी महाराजांच्या रथाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
८ डिसेंबर रोजी संत भगवद भक्त शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती देऊळगाव राजे येथील तेली समाज यांनी मतिमंद मुलांच्या शाळेत साजरी केली. समस्त तेली समाज देऊळगाव राजे व तेली समाज दौंड उपस्थित होते. आर्वी फाट्या जवळ निवासी मतिमंद मुलांची कृषी प्रशिक्षण कार्यशाळा मुक बधीर आश्रम शाळा आहे. तेथे ४० ते ४५ विशेष आणि दिव्यांग मुले आहेत त्यांना खाऊ वाटप चे नियोजन करण्यात आले होते,
सिल्लोड : शहरातील श्री. संत संताजी जगनाडे महाराज चौक व कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालयात थोर संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नॅशनल सुत गिरणीचे संचालक अब्दुल आमेर यांच्या हस्ते जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा राजश्री निकम,