चांदवड शहरात श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचा ३९८ वा जयंती सोहळा साजरा करण्यात आला. प्रारंभी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ समाजबांधव जगन्नाथ राऊत, अध्यक्ष रमेश जाधव, उपाध्यक्ष गणेश वाघ यांच्या हस्ते करण्यात येऊन संताजी महाराजांच्या रथाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
८ डिसेंबर रोजी संत भगवद भक्त शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती देऊळगाव राजे येथील तेली समाज यांनी मतिमंद मुलांच्या शाळेत साजरी केली. समस्त तेली समाज देऊळगाव राजे व तेली समाज दौंड उपस्थित होते. आर्वी फाट्या जवळ निवासी मतिमंद मुलांची कृषी प्रशिक्षण कार्यशाळा मुक बधीर आश्रम शाळा आहे. तेथे ४० ते ४५ विशेष आणि दिव्यांग मुले आहेत त्यांना खाऊ वाटप चे नियोजन करण्यात आले होते,
सिल्लोड : शहरातील श्री. संत संताजी जगनाडे महाराज चौक व कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालयात थोर संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नॅशनल सुत गिरणीचे संचालक अब्दुल आमेर यांच्या हस्ते जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा राजश्री निकम,
श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदुंबरे, श्रीक्षेत्र सुदुंबरे, ता. मावळ, जि. पुणे. श्री संत संताजी महाराज पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम पत्रिका मार्गशीर्ष वद्य सप्तमी ते मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी दि. १५ डिसेंबर २०२२ ते २२ डिसेंबर २०२२ अखंड हरिनाम सप्ताह.
काटोलमध्ये ७५० जणांची आरोग्य तपासणी
काटोल : संत जगनाडे महाराज जयंतीचे औचित्य साधून स्थानिक संताजी उत्सव समितीच्या वतीने जगनाडे महाराज मंदिरात भागवत सप्ताह तसेच आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले. या शिबिरात ७५० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी ८४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिरात डॉ. रितेश नवघरे, डॉ. प्रिया नवघरे,