श्री संताजी प्रतिष्ठान नगररोड, पुणे -१४ मकर संक्रांति निमित्त हळदी कुंकु, तिळगुळ वाटप व विद्यार्थी गुण गौरव कार्यक्रम. मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळ व हळदी-कुंकू तसेच विद्यार्थी गुणगौरव समारंभ आपल्या संस्थेतर्फे शनिवार, दिनांक २८ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. तरी आपली तेली समाज बांध्वांची उपस्थित राहण्याचे आव्हान करण्यात आलेले आहे.
नि:शुल्क नोंदणी- जवाहर विद्यार्थी गृह नागपूर संस्थेतर्फे तेली समाजाच्या विवाहयोग्य युवक-युवतींचे परिचय असलेल्या 'सुयोग' विदर्भ स्तरीय पुस्तकांसाठी नावे नोंदणी नि:शुल्क सुरू झालेली आहे. दररोज कार्यालयीन वेळेत (११ते६) सिव्हिल लाइन्स व नंदनवन येथे पासपोर्ट साइझ 02 फोटो जोडून फॉर्म भरून दिलेल्या पत्यावर पोहचतील या बेतानी Pdf मध्ये दिलेला फार्म भरुन पाठवून द्यावा.
अहमदनगर जिल्ह्याचा स्वाभिमान जपणारी एकमेव संस्था अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभेच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यात शेवगाव तालुका व शहर येथे कु. शुभदाताई रामेश्वर सोनवणे यांची निवड अहमदनगर जिल्हा तेली समाजाच्या महिला जिल्हाध्यक्ष (युवती आघाडी) यापदी केली व महाराष्ट्र राज्यात सर्वप्रथम युवती आघाडीची स्थापना करून प्रथम जिल्हाध्यक्ष पदी निवड केली
२६ जानेवारी २०२३ आज स्वतंत्र भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन व आपल्या जिल्ह्याचा स्वाभिमान जपलेल्या अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा या आपल्या समाज संस्थेचा द्वितीय २ रा वर्धापनदिन, यानिमित्ताने आपल्या सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा दिल्या गेल्या.
दिनांक 28/1/2023 ला जवाहर विध्यार्थी गृह, संत्रा नगरी व मेट्रो सिटी नागपूर येथे आयोजित करण्यात आले. विविध वयोगटाच्या मुली व महिलांनी आपल्या कलेचे प्रदर्शन केले. सौ. पूजा कांबळे यांनी साकारलेली श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांची हुबेहू रांगोळीने विशेष लक्ष वेधले, कार्यक्रमात नृत्य, लावणी , पोवाडे, उखाणे, गाणे, गेम्स व अन्य आयोजनामुळे महिलांनी कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला