Sant Santaji Maharaj Jagnade
सावजी तेली समाज स्नेही मंडळ, अकोला च्यावतीने प्रतीवर्षी प्रमाणे या वर्षी ही वार्षिक स्नेह संमेलन, व मकर संक्रांती निमित्त, तिळगुळ कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. कार्यक्रम : रविवार दि. १२ फेब्रुवारी २०२३ वेळ : दु. १ पासून स्थळ : IMA हॉल, आकाशवाणी समोर, अकोला या कार्यक्रमास खालील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अहमदनगर जिल्हा तेली समाजाचे शिलेदार राहता तालुक्याचे जेष्ठ मार्गदर्शक सदैव स्मरणात राहील असे समाज कार्याचा महामेरू आदरणीय कै. बाबुरावजी साळुंके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अहमदनगर जिल्हा तेली समाज याअंतर्गत राहता तालुका तेली समाजाची प्राथमिक बैठक रविवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ रोजी श्री विठ्ठल रुख्मिनी मंदिर कनकुरी रोड शिर्डी येथे मोठया उत्साहात संपन्न झाली.
श्री साईबाबांच्या पुण्यनगरीत लवकरच श्री साईबाबा सेवा संस्थान, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स, शिर्डी ग्रामस्थ, अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा व सर्वांच्या सहभागातून होणार आहे सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा 2023 वर्ष 2 रे ज्या प्रमाणे आपण श्री साईलीला पालखी सोहळा समिती स्थापन करून आपला पालखी सोहळा गेल्या 20 वर्षांपासून यशस्वी करत आहोत
महाराष्ट्र राज्य पद्मवंशीय तेली समाज विकास मंडळ आयोजीत भव्यदिव्य सामुहिक विवाह सोहळा - २०२३ पद्मवंशीय तेली समाजाचा भव्यदिव्य सामुहिक विवाह सोहळा श्री.गोविंद समर्थांच्या पावन भुमीत श्रीक्षेत्र प्रति पंढरपुर पिंपळगाव (हरे.) ता.पाचोरा जि.जळगांव येथे दि.१४ फेब्रुवारी २०२३ रोजी दु. १.०५ मि. संपन्न होत आहे. या मंगलमय कार्यक्रमास
दिव्यत्वाची जेथे प्रचीती तेथे कर माझे जुळती
असे ज्यांना भेटताक्षणी म्हणावेसे वाटत होते, अशा दिव्यमूर्ती, प्रेममूर्ती, करुणा मूर्ती, स्व. श्रद्धेय आदरणीय आदर्श माता पर्वताआईची समर्पित जीवन यात्रेची सांगता गेल्या ३१ जानेवारी २०२३ या दिवशी निसर्ग नियमाप्रमाणे, वृद्धापकाळाने वयाच्या ९४ व्या वर्षी झाली.