Sant Santaji Maharaj Jagnade
राहूरी - राहुरी तालुका अध्यक्ष पदाची निवडणुक नुकतीच बिनविरोध झाली. श्री. सोनवणे हे या पुर्वी ही म. तैलीक महासभेचे तालुका अध्यक्षपदी होते. स्पष्ट स्वच्छ भुमीका व आपल्या कार्यावर निष्ठा या बळावर ते उभे होते. त्यांनी तालुक्यातील ग्रामीण भाग संघटित करून विविध कार्यक्रम राबविले होते.
अ. नगर - या जिल्हा स्तरावर विस वर्षा पुर्वी अ. नगर जि. तेली संघटनावर काम करित होते. या संघटनेत संस्थापक सचिव श्री. देवकर होते. संस्था उभी करण्यास त्यांनी कष्ट ही घेतले होते. श्री. संत संताजी पतसंस्थेचे ते चेअरमन ही होते. समाजाची ही संस्था अडचनीत गेली म्हणुन गप्प न रहाता संस्थेला संजीवनी दिले.
वीरशैव लिंगायत तेली समाजसेवा संस्था, बार्शी
आयोजित
राज्यव्यापी वधु-वर पालक परिचय मेळावा
रविवार दिनांक 6/8/2017 रोजी सकाळी 11वाजता
स्थळ वीरशैव लिंगायत बोर्डिंग,लता टॉकिज जवळ,बार्शी
![]()
नाव सार्थक करणारे खा. तडस ! - प्रफुल्ल व्यास, वरिष्ठ उपसंपादक, दै. तरूण भारत, वर्धा
नावात काय आहे ? असे शेक्सपिअरने म्हंटले. परंतु आपल्या संस्कृतीत नाव ठेवण्याचाच कार्यक्रम (बारसे) धुमधडाक्यात केले जाते. याचा अर्थ नावातच सर्वकाही आहे. आईने ठेवलेलेे नाव यथार्थ कसे करायचेे हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते. देवळी सारख्या छोट्याशा तालुका स्थानावरून राजकारणाची सुरूवात करणार्या खासदार रामदासजी तडस यांनी आईने ठेवलेेले नाव सार्थक लावण्याचा जणू चंगच बांधला असल्याचे त्यांच्या कार्यशैलीतुन स्पष्ट होते.
![]()
तेली समाजाची संघर्षाची वाटचाल म्हणजे खा. तडस - प्रकाश गिधे उपाध्यक्ष महाराष्ट्र तैलिक तेली महासभा उ. पु. जि.
मी तसा चळवळीतला माणुस दत्ता सामंत यांच्या संघटेनेचा घटक. तो मिल कामगारांचा लढा लढलो आणी गिरणीबंद पडताच गावाकडे आलो. जवळ होते शुन्य उभा राहिली आणी संघर्ष सुरू केला. हा संघर्ष एकट्याचा. माझे गाव डोंगर दर्यातले सर्व साधने कमी अंगावर पाऊस घेऊन लढताना जाणवले मी एकटा आहे. परंतु माझ्या सारखे परिस्थीतीने गंजलेले माझ्या गावात माझ्या तालुक्यात, हजारो आहेत. ही सर्व मंडळी पिचत भरडत रडत आहेत. त्याच्या जगण्याची धडपडीची जाणीव कुणालाच नाही. आपन एकत्र येऊ ही ओळख ही नव्हती आणी आपन असेच पोटातले दु:ख उरात ठेवून वावरावे ही आमची ठेवन होती.