Sant Santaji Maharaj Jagnade
नेत्यांना ताक व दुध कळत नसेल तर सगळेच केरात जाणारच. (भाग 2) - मोहन देशमाने
तेली समाजाच्या आघाडीच्या मासीकात परवा एक लेख वाचला तेंव्हा मला जानेवारी 2014 मधील प्रसंग आठवला. तो प्रसंग घडला तेंव्हाच सांगीतले विचार दडपू नका कारण हे बुमर्यांग तुम्हाला ही दडपुन टाकेल. रहाता जि. नगर येथे श्री संत संताजी पुण्यतीथी होती. जिल्हा पातळी वरील नेते हजर होते. ही घटना घडण्यापुर्वीची समाज अवस्था पाहू विकासाचा महापुरूष म्हणून त्यावेळचे गुजराथचे मुख्यमंंत्री मा. नरेंद्र मोदी भावी पंतप्रधान म्हणून समोर होते. ते जन्माने तेली आहेत. आणी याच वेळी भाजपाने त्या त्या जातीतले नेते निवडून त्या जाती आपल्या पंखा खाली घेण्यास महा रस्ता निर्माण केला होता.
नेत्यांना ताक व दुध कळत नसेल तर सगळेच केरात जाणारच. (भाग 1) - मोहन देशमाने
संत तुकारामांनी अभंगात ठणकावून सांगितले. मी कोण आहे तर एक शुद्र घरात जन्म घेतलेला एक साधा माणुस आहे. वेद, स्मृती, ब्राह्मण्य, उपनिषदे पाहु शकत नाही तिथे वाचणे दुरच. त्याचा अभ्यासकरुन मांडणे त्या ही पेक्षा दूर आहे. आणी असा मी जरूर असलो तरी तुमच्या शास्त्रमताला झिडकारून सांगतो. की मी कोण आहे तर मी देव निर्माण करणारे म्हणुन जे सांगतात त्यांचे आम्ही बाप आहोत. आसे व्यवस्थेला सुरूंग लावुन उध्वस्त करणारे विचार जपणारे, संभाळणारे व शेकडो वर्षा करिता ठेवणारे महा मानव संताजी, संताजींच्या नावाने संघटना, संताजीचे पुजन करून सभा, बेठका, भाषण बाजी, व जेवणावळी संपन्न होतात. फॉर्म पासून उद्घटना पर्यंत संताजीला समोर ठेऊन वधुवर मेळाव्याचा स्मार्ट समाज उत्सव साजरा करतो. फक्त पुण्य स्मरणा आगोदर व पुण्यतिथी दिवशी जयजयकार.
डॉ. मेघनाद साहा तेली समाजाचे प्रेरणा स्तोत्र (भाग 12) :- डॉ. सुधाकर चौधरी, प्राणी शास्त्र विभाग कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी ![]()
निधन :- मेघनाथ साहा यांच्या प्रगतिशील विचारांमुळे व प्रयत्नाने भारतात पदार्थ विज्ञाना ला मोठ प्रोत्साहन मिळाले होते. प्रतिभा संपन्न मेघनाथ साहा यांचा वयाच्या 63 व्या वर्षी 16 फेब्रुवारी 1956 रोजी तीव्र हृदय विकाराचे झटक्याने संसद भवना जवळ निधन झाले.
डॉ. मेघनाद साहा तेली समाजाचे प्रेरणा स्तोत्र (भाग 11) :- डॉ. सुधाकर चौधरी, प्राणी शास्त्र विभाग कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी
पारितोषिक - 1934- 35 साली त्यांचे नामाकन नोबेल पारितोषका साठी गेले होते. प्रेमचंद रायचंद शिषयवृत्ती, बाह्यो एज्युकेशन सोसायटी, शिष्यवृत्ती, तार्यांच्या वर्ण पटाशी असलेला सबंध यासाठी कोलकत्ता विद्यापीठाने त्यांना 192% साली ग्रिफिथ पारितोषिक दिले.
डॉ. मेघनाद साहा तेली समाजाचे प्रेरणा स्तोत्र (भाग 10) :- डॉ. सुधाकर चौधरी, प्राणी शास्त्र विभाग कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी
समाज कार्य - भारतीय सौर पंचांग सुधारणा समितीचे ते प्रमुख होते म्हणुन भारतीय सौर पंचांग निमिर्तीचे / सुधारण्याचे काम त्यांनी केले. जे 22 मार्च 1957 (1 चैत्र 1879 शक) पासून लागु झाले. साहा हे नद्या जोड प्रकल्पाचे मुख्य प्रवतर्क होते. दामोदर खोर प्रकल्पांची मुळ संकल्पना त्यानी तयार केली.