Sant Santaji Maharaj Jagnade
नगर - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक सभेच्यावतीने ओबीसींवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आंदोलन सुरु केले आहे. जातीमधील सर्व पोटजाती विसरुन तेली समाजासह ओबीसी समाज संघटन मजबूत व्हावे हे काळानुरुप गरजेचे आहे. प्रांतिक तैलिक महासभेच्या तेली समाजाच्या अॅपद्वारे समाजाची महाराष्ट्रभर जनगणना व्हावी व समाजाचा डाटा गोळा करणे गरजेचे आहे. तसेच ओबीसींवरील होणार्या अन्यायाबाबत वेळप्रसंगी समाज रस्त्यावर उतरेल.
समाजबांधवांचे संघटन झाले तरच प्रश्न सुटतात- आसाराम शेजूळअहमदनगर : समाजाची उन्नत्ती व्हावी, यासाठी संघटन महत्वाचे असते. पदाधिकार्यांच्या चांगल्या कामातून हे शक्य होते. तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने गेल्या काही वर्षात समाज बांधवांचे मोठ्या प्रमाणात संघटन करुन एकीचे बळ दाखवून दिल्याने प्रश्न सुटत आहे. त्यामुळे विविध उपक्रमांतून समाजाची प्रगती साध्य होत आहे
संत जगनाडे महाराज यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले : जाधवअहमदनगर : संतांचे विचार है आपले जीवन सुखी करण्यासाठी निर्माण केले गेले आहे. त्यांचे विचार आचरणात आणून आपण आपले जीवन सार्थकी लावले पाहिजे. संत श्री जगनाडे महाराज यांनी आपल्या कार्यातून समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शक तत्वावर तिळवण तेली समाज ट्रस्ट काम करुन समाजोन्नत्तीचे काम करत आहे. विविध उपक्रमातून समाजाची प्रगती साधत आहे.
राहाता : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, संताजी जगनाडे महाराज यांचे विचार आणि साहित्य हे प्रेरणादायी असून संतांनी कधीही कोणत्या एका समाजासाठी काम केले नाही. संतांनी नेहमी सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला, असे मनोगत राहाता नगरपालिकेच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा यांनी राहाता नगरपालिकेत बोलताना व्यक्त केले.
जवळे : संताजी जगनाडे महाराज यांची ३९७वी जयंती पारनेर तालुक्यातील जवळे येथील ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. ज्येष्ठ नागरिक मदन कृष्णाजी रत्नपारखी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.