Sant Santaji Maharaj Jagnade
समाजाच्या नेत्यांची एक पद्धत ठरली आहे. ज्याच्याकडे चार चाकी गाडी आहे. ज्याची गावात शहरात प्रतिष्ठा आहे. ज्याच्याकडे चार प्रतिष्ठीत नातलंगांची साठवण आहे. ज्याला या सोबत वेळ आहे. असा समाज बांधव समाज संस्थेचा अध्यक्ष असु शकतो असा साठवण असलेला बांधव समाज संघटनेत मानासाठी निवडला जातो. या सर्व प्रक्रिया निदान राहुरी शहरात बगल देऊन ज्याच्या जवळ समाज निष्ठा आहे. आशा बांधवालाच तेली महासभेचे अध्यक्ष पद देण्यात आले. यांची सार्थ निवड ही त्यांनी बर्याच बाबत सार्थक लावली हे श्री. दत्तात्रय नरसिंह सोनवणे यांनी सिद्ध केले आहे.
सदर कार्यक्रमाची सुरवात श्री संताजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली या कार्यकमाच प्रमुख पाहुणे मंबई हायकार्टाचे वकील अॅड. विपीन कामडी हजर होते. तसेच सहाय्यक पुरवठा अधिकारी सौ. रोहणीताई शिंदे, पी.एस.आय. शिंदे मॅडम नगरसेविका सौ. आश्विनीताई जाधव नगरसेवक श्री. गोपाळजी तिवारी, अभयजी छाजेड, प्रियाताई महिंद्रे, संताजी प्रतिष्ठाणचे कोथरुड अध्यक्ष श्री. रत्नाकर दळवी डॉ. मयुर क्षीरसागर इ. मान्यवर हजर होते.
![]()
आता पालखीला भक्कम पाया लाभला होता. चालणार्या वारकर्यांच्या पायाखाली जी वाळू होती ती संपली. आता ती सरकण्याचा प्रश्नच नव्हता सर्वानी जुने वयोवृद्ध व्यवहारे मामांना जवळ घेतले. पालखीचा मोठा ध्वज त्यांच्याजवळ दिला. त्यांना झेंडेकर्याचा मान दिला सर्व बांधवांनी दर्शन घेतल्यानंतर पुणे सोडले तरी अनेक बांधव पालखीबरोबर वडकी नाल्यापर्यंत सोबतीला आले.
![]()
मार्गदर्शन मिळाले माहिती मिळाली आता यापुढे काय ? हा प्रश्न उत्तर न देता रोज सतावत होता. अशीच एक वेळ सुदुंबरे येथे कार्यकारिणीचा उत्सव कसा साजरा करावा या विषयी नेहमीप्रमाणे मीटिंग होती. ही बातमी समजताच राऊत इंदोरीहून सुदुंबर्यास गेले. मागील अनुभव जमेस असल्याने त्यांनी पालखीचा विषय या मिटींगमध्ये उपस्थित काही केला नाही
मीटिंगच्या ठरलेंल्या विषयावर चर्चा वगैरे होऊन मीटिंग संपणार तोच राऊत उभे राहिले. आपली आहे ती ओळख सांगितली. संताजी महाराज यांची पालखी आपल्या संस्थेद्वारे पंढरपूर येथे जावी. याबाबत कार्यकारिणीने विचार करावा. मग यावर चर्चा सुरू झाली. वारकर्यांची मते होती तशीच कार्यकारीणीची मते होती. सर्वांनी बहुमताने त्यानी मांडलेला ठराव फेटाळला. राऊतांना दु:ख झाले. ही आपली मंडळी, पण हीसुद्धा साथ देण्यास असमर्थ आहेत.