Sant Santaji Maharaj Jagnade सर्व समाज बांधवाना एक आनंदाची बातमी ज्या कार्यक्रमाची आपण गेल्या दोन वर्षांपासून वाट बघतोय तो कार्यक्रम म्हणजे "तिळवण तेली समाज राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा,औरंगाबाद." होतोय दि.२४०१२०१६ रोजी संत तुकाराम महाराज नाटयगृह,एन-५,सिडको,औरंगाबाद येथे.
तरी समाजातील उपवर-वधु नी मोठया संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.
जय संताजी
ओबीसीच्या टक्केवारीत वाढ होणारा आणि तो समाज शिक्षण, नोकरी, सत्ता या सर्वांमध्ये वाटा मागणार या सर्व कारणांमुळे ओ.बी.सी. ची जातीनिहाय जनगणनला होउ दिली जात नाही. असे मत श्री. रमेश भोज अध्यक्ष पुणे ओबीसी सेवा संघ, पुणे जिल्हा दि. २६/०६/२०१५ रोजी आरक्षणाचे जनक राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंती निमित्त झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केले.
श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदुंबरे शिष्यवृत्ती फॉर्म
![]()
श्री. अरविंद रामचंद्र रत्नपारखी (गुरूजी) कोथरूड पुणे.
तुझ्या वडिलो वडीली निर्धारी I चालविली पंढरीची वारी II
त्यासी सर्वथा अंतर न करी I तरीच संसारी सुफळपणा II
प्रत्येक काम वेळच्या वेळी करणारे शिस्तप्रिय असे आमचे वडील श्री. रामचंद्र महादेव रत्नपारखी (तेली गुरुजी).”येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो I हा होईल दान पसावो II येणें वरें ज्ञानदेवो I सुखिया झाला...II” हा त्यांच्या रोजच्या नित्यकर्मातील ज्ञानेश्वरी वाचनानंतरचा पसायदानाचा समारोप अजूनही कानात घुमतो आहे.
महाराष्ट्र प्रांतीक तेली महासभा बैठक :- सांगली जिल्ह्याचे डॉ. संजय गताडे यांनी सांगीतले की, तालुका व जिल्हा पातळीवर सामाजाची संपर्क कार्यालये असावीत तेथुन सर्वसामान्य समाजबांधवास देखील महाराष्ट्रात कुठेही पदाधिकार्यांशी संपर्क साधता यावा. समाजाने हायटेक व्हावे.