मौजा - उमरी / लवारी येथे दि. १९ व २०/१२/२०२३ रोज मंगळवार व बुधवारला प.पु. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सव स्थळ - जगनाडे चौक उमरी हरीभाऊ प.लांजेवार या. आवारात संपन्न होत आहे.सर्व समाज बांधवांना नम्र विनंती करण्यात येते आहे की, तेली समाजाचे आराध्य दैवत परमपूज्य संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचे पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.
खामगाव - संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील सुदुंब्रे या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला. विठोबा जगनाडे व आई मथाबाई हे विठ्ठलभक्त होते. त्यामुळे संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. संत श्री जगनाडे महाराज हे संत तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्या पैकी एक झाले.
अमरावती जिल्हा तैलिक समिती, सर्वशाखीय द्वारा तेली समाज उप वधू-वर परिचय महा मेळावा रविवार, दि. ३१ डिसेंबर २०२३ नोंदणी फॉर्म उपवधु-उपवर माहिती कार्यालयाचा पत्ता - श्री संताजी मंदिर, भुमिपुत्र कॉलनी, काँग्रेस नगर अमरावती. वेळ - सकाळी ९.०० ते सायं. ५.००
नागपूर : तेली समाज सभा नागपूर जिल्ह्यातर्फे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. बाबूरावजी वंजारी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संताजी सांस्कृतिक सभागृह, सोमवारी पेठ येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत, आ. अभिजितजी वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली श्रद्धांजली सभा संपन्न झाली. याप्रसंगी माजी मंत्री नितीन राऊत, आ. कृष्णा खोपडे,
भंडारा : विदर्भ तैलिक सेवा संघटन जिल्हा युवा आघाडीच्या वतीने स्थानिक श्री संत संताजी जगनाडे महाराज, तेली समाज संताजी सभागृहात मंगळवारी कोजागरी साजरी करण्यात आली. उद्घाटन श्री संताजी सेवा मंडळ सहकार्यवाह मंगेश वंजारी यांच्या हस्ते झाले.