अक्कलकुवा - अक्कलकुवा येथील फर्स्ट आईडिया इंटरनेशनल स्कूल मध्ये संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतीथी साजरा करण्यात आली. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतीथी पर साजरा केल्या जाणाऱ्या दिवसाप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि म्हणून महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा नंदुरबार जिल्ह्याचे उपाध्यक्ष भानुदास चौधरी यांनी प्रतिमेचे पूजन केले.
दि.1 वैजापूर जि.औरंगाबाद - श्री.संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा निमित्त विनम्र अभिवादन व कार्यक्रमांचे आयोजन शिवराई रोड, वैजापूर येथे करण्यात आले. ह. भ. प. श्री. प्रकाश महाराज कदम यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.यानंतर ह. भ. प. श्री. ज्ञानेश्वर महाराज मधाने (शिवुर) यांचे सुश्राव्य प्रवचन झाले. यानंतर दोन्ही महाराजांचे पुजन श्री. विलास गोपीनाथ भुजबळ व सौ. शोभाताई भुजबळ,
सोनगीर : मुडावद, ता. शिंदखेडा येथील ग्रामपंचायतीत संताजी जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सरपंच भारती चौधरी व उपसरपंच सुनीता मालचे यांच्या हस्ते जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन केले. यावेळी तेली समाजाचे कार्यकर्ते सुरेंद्र चौधरी व तेली समाज बांधव तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
परळी : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने समाज जोडो अभियान अंतर्गत श्री. संत संताजी जगनाडे महाराज पालखी रथाचे परळीकरांच्या वतीने मोटारसायकल रॅलीने भव्य स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने समाज जोडो अभियान अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात रथयात्रेस संत संताजी महाराज जयंती निमित्त (८ डिसेंबर) संताजी महाराज जन्मस्थान चाकण येथून रथयात्रा सुरुवात करण्यात आली.
उस्मानाबाद, दि. १७ - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने समाज जोडो अभियान रथ यात्रेतील संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची मुर्ती, संताजींच्या पादुका, हस्त लिखीत गाथा यांचे पूजन तुळजापूर नगरीत आई तुळजाभवानीच्या महाद्वार येथे संताजी जगनाडे महाराजांचे ११ वे वंशज गोपाळशेट जगनाडे व बाळासाहेब काळे, तुळजाई पतसंस्थेचे चेअरमन राजाभाऊ देशमाने, जिल्हाध्यक्ष रवी कोरे, राज्य समन्वयक सुनिल चौधरी,