छत्रपती संभाजीनगर येथे तेली समाजाच्या वतीने संताजी चौक एन २ सिडको, राजीव गांधी नगर येथे आभिवादन करण्यात आले. संताजी चौकाच्या नामफलकाचे पूजन माजी नगरसेवक भाऊसाहेब जगताप यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष राधाकिसन सिदलंबे हे होते.
संत साहित्याने समृद्ध असेल्या महाराष्ट्रात अनेक संतांनी आपल्या प्रगल्भ अमृत विचार वाणीतून समाजच्या उत्थानासाठी मार्गदशन केले आहेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव यांच्यापासून ते अलीकडच्या काळातील संत तुकडोजी महाराजांपर्यंत अशा अनेक संतांनी समाजाच्या उत्थानासाठी आपल्या बौद्धिक विचारांनी संत साहित्याला समृद्ध केले आहे.
नागपूर, ता. १० : संताजी ब्रिगेड तेली समाज महासभेतर्फे संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने पारडी येथून संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेसह भव्य बाईक रॅली व भव्य शोभायात्रा करण्यात आली. त्याच प्रमाणे ढोल ताशा पथक व पारंपरिक आखाड्याचे सुद्धा प्रात्यक्षिक करण्यात आले. बाईक रॅली चे समापन जगनाडे चौक नागपूर येथे करण्यात आले. यावेळी संत जगनाडे महाराजांना संस्थापक अजय धोपटे अध्यक्ष विजय हटवार,
श्रीगोंदा : काष्टी मध्ये सर्व जाती... धर्म ... पंथनी... एकत्र येऊन सर्व धर्म समभावाने राष्ट्रीय ऐक्य साधत... जगद्गुरु संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे यांची ३९९ वी जयंती जन्मोत्सव काष्टी ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहात साजरी केली.
साळवा - ज्याचा नोहे भंग तोची जाणावा अभंग देह आपुला भंगतो माती मिळोनिया जातो. त्याचे होईनाच काही अंतरी शोधुनिया पाहि प्राण जातो. यमपाशी दुःख होते ते मायेशी संतु म्हणे असा अभंग गाईला. पुढे चालु केला देहावरी, याद्वारे समाजाला जीवनाचा अर्थ उलगडणारे श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या फोटोचे पूजन व माल्यार्पण करून शुक्रवारी (८ डिसें.) जयंती साजरी करण्यात आली.