नगर - संतांचे विचार हे आपले जीवन सुखी करण्यासाठी आहेत. त्यांचे विचार आचरणात आणून आपण आपले जीवन सार्थकी लावले पाहिजे. संताजी जगनाडे महाराजांनी केलेल्या कार्यामुळे आज जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग आपल्यापर्यंत पोहचलेत. संत श्री जगनाडे महाराज यांनी आपल्या कार्यातून समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शक तत्वावर तिळवण तेली समाज ट्रस्ट काम करुन समाजोन्नत्ती करत आहे.
सिडको : तेली समाजातर्फे त्रिमूर्ती चौक, सिडको येथे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचा ३९८ वा जयंती उत्सव उत्साहात साजरा करून अभिवादन करण्यात आले.
श्री संत जगनाडे महाराज सेवा मंडळ, संताजी युवक मंडळ, सर्वांगीनी महिला मंडळ, सिडको विभाग यांच्यातर्फे श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सिडको तेली समाजाचे बी. जी. चौधरी यांनी केले.
जाफराबाद आपला देश तथा महाराष्ट्र भुमी म्हणजे साधु संत थोर महात्म्यांची असुन येथे जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीने महापुरुषांनी सांगितलेल्या विचारांनी आपल्या जीवनाची वाटचाल केल्यास यशस्वी जिवन जगता येते म्हणुन त्यांनी दाखविला मार्ग त्यांचे विचार डोक्यावर न घेता डोक्यात घ्यावे मनात उच्च ध्येय ठेवुन तथा आपण आपल्या देशाच समाजाच काहीतरी देणं लागतो या भावनेतुन जिवनाची वाटचाल करावी,
पालघर येथे श्री संताजी सेवा मंडळ व संताजी सखी महिला, हिरकणी महिला ग्रुप पालघर विभाग. तेली समाजाच्या वतीने सौ. स्मिताताई संतोष गव्हाडे, पालघर जिल्हा सचिव. ह्यांनी आपल्या निवासस्थानी,श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन केले होते ! त्यांनी पालघर जिल्हा, बोईसर, वानगाव, डहाणू, विरार, वसई विभागतील सर्व, सोशल मीडिया व्हॉट्सॲप द्वारे
जामनेर: शहरातील कमल हॉस्पिटल येथे संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी महिला आघाडी व प्रदेश तेली महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.