चांदवड शहरात श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचा ३९८ वा जयंती सोहळा साजरा करण्यात आला. प्रारंभी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ समाजबांधव जगन्नाथ राऊत, अध्यक्ष रमेश जाधव, उपाध्यक्ष गणेश वाघ यांच्या हस्ते करण्यात येऊन संताजी महाराजांच्या रथाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदुंबरे, श्रीक्षेत्र सुदुंबरे, ता. मावळ, जि. पुणे. श्री संत संताजी महाराज पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम पत्रिका मार्गशीर्ष वद्य सप्तमी ते मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी दि. १५ डिसेंबर २०२२ ते २२ डिसेंबर २०२२ अखंड हरिनाम सप्ताह.
अकोला, ता. ८ : तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचा जंयती उत्सव गुरुवार, ता. ८ डिसेंबरला राठोड पंच बंगला शिवाजीनगर अकोला येथे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
शिर्डी - संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या ३९८ व्या जयंतीनिमित्ताने शिर्डी शहर तेली समाज व शिर्डी नगरपरिषद शिर्डी यांच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मंदिर शिर्डी येथे सकाळी ९:०० वाजता अभिषेक पूजा दिलीप भाऊ राऊत व सौ आशाताई राऊत यांच्या हस्ते संपन्न झाली तर सकाळी १०:३० वाजता शिर्डी नगर परिषदेत मध्ये मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे साहेब
नगर महाराष्ट्राला अनेक संतांची मोठी परंपरा आहे, या संतांनी आपल्या त्यागातून समाजाला जागृत करून दिशा देण्याचे काम केले आहे. संत संताजी महाराजांनी आपला प्रपंच, व्यवसाय आणि समाज यात उत्तम संतुलन साधत समाजोन्नत्तीचे काम केले त्यांचे विचार आणि कार्य आजही आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांचे विचार जीवनात प्रत्येकाने अंगीकारले पाहिजे.