राहुरी - सालाबाद प्रमाणे शुक्रवार २५ ऑगस्ट रोजी राजूर ते शनिशिंगणापूर तेल कावड यात्रेचे राहुरी शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. तेली समाजाच्यावतीने आणि राहुरी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष ताराचंद तनपुरे यांच्या हस्ते कावड यात्रेस तेल अर्पण करण्यात आले. या वेळी नामदेव महाराज शेजूळ, सदाशिव पवार,
शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते व तेली समाजाचे जेष्ठ नेते श्री बद्रीनाथ मामा लोखंडे यांची अखिल भारतीय तेली महासभा या तेली समाजाचे राष्ट्रीय संघटनेत महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश अध्यक्ष पदी राष्ट्रीय अध्यक्ष श्री बाबूलालजी राठोड साहेब यांच्या शिफारशी नुसार निवड करण्यात आली.
तळेगाव दाभाडे,: तळेगावचा सुपुत्र डॉ. ऋत्विक बारमुख याची चौथ्या नासा स्टार प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. अंतराळ तंत्रज्ञान वापर व संशोधन या विषयावर १९ सप्टेंबर २०२३ ते २७ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत परिषदा व चर्चासत्रे होणार असून त्यात ऋत्विकला सहभागी होता येणार आहे.
धुळे - खान्देश तेली समाज मंडळ आयोजित खान्देशस्तरीय गुरु गौरव सोहळा रविवार दिनांक १० सप्टेंबर २०२३ रोजी धुळे महानगरामध्ये आयोजित करण्यात येत आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मंत्री मा.श्री धनंजयजी मुंडे व अकोला जिल्ह्यातील आमदार
पिंपरी चिंचवड शहर तेली समाज आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व कौटुंबिक स्नेह मेळावा २०२३ रविवार दिनांक २३/०७/२०२३ रोजी सकाळी १० ते २, स्थळ - संतोष मंगल कार्यालय संतोष नगर, १६ नं. बस स्टॉप, औंध - रावेत रोड, थेरगांव, पुणे ३३.