मालेगाव : महानगर तेली सम ज, व श्री संताजी महाराज उत्सव समिती तर्फे अंबिका मंदीरात संताजी जयंती साजरी करण्यात आली.तसेच गतवर्षीच्या महाराष्ट्र सरकारच्या परिपत्रकाप्रमाणे मालेगाव शहरात विविध शासकीय/निमशासकीय कार्यालयात संताजी जयंती साजरी करण्यात आली.
श्रीगोंदा तेली समाज - राष्ट्र संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती श्रीगोंद्यात उत्साहात साजरी करण्यात आली. तेली समाजाच्या वतीने जगनाडे महाराज यांची प्रतिमा तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना समाजाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष राऊत यांच्या हस्ते भेट देण्यात आली. शनी मारुती मंदिरात देखील जयंतीचा कार्यक्रम पार पडला. येथील नगरपरिषदेच्या सभागृहात नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांच्या अध्यक्षतेखाली जयंती साजरी करण्यात आली.
मालेगाव कॅम्प : येथील महानगर तेली समाज आणि संताजी महाराज उत्सव समितीतर्फे अंबिका मंदिरात संताजी महाराज जयंती रविवारी (ता.८) झाली. यानिमित्त संताजी उत्सव समितीतर्फे मिरवणूक काढली होती. त्यानंतर प्रमुख पाहणे माजी मंत्री, आमदार दादा भुसे यांनी प्रतिमापूजन केले. या वेळी अध्यक्ष सर्जेराव चौधरी, संस्थापक माणिक चौधरी, उपाध्यक्ष बंडू चौधरी, कोशाध्यक्ष शिवाजी चौधरी, सचिव विशाल चौधरी, मालेगाव महानगर तैलिक महासभा, संताजी ब्रिगेड संघटना आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी
अर्धापूर तालुका तेली समाज - श्रीसंत संताजी जगनाडे महाराज यांनी केलेल्या कार्याचा आदर्श घेऊन तरूणांनी त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालवून भविष्यातील आवाहने पेलविण्यासाठी शिक्षणाकडे लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन अॅड. किशोर देशमुख यांनी केले.
महाराष्ट्र तैलिक युवाच्या वतीने श्रीसंत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपंचायत गटनेते अॅड. किशोर देशमुख हे होते.
नाशिक तेली समाज : संताजी महाराज जगनाडे यांची जयंती जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. सरकारने सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये संताजी महाराजांची जयंती साजरी करण्याबाबतचे परिपत्रक काढल्यानंतरची ही पहिलीच जयंती असल्याने याबाबत सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून आले. यानिमित्ताने प्रतिमापूजन, मिरवणुकांसह विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले.