Sant Santaji Maharaj Jagnade
मेहकर : संताजी कॉन्व्हेंटमध्ये महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा घाटावरील कार्यकारिणी व महिला घाटावरील कार्यकारिणों गठीत करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष विष्णूपंत पाखरे व महिला जिल्हाध्यक्षा सुषमा राऊत यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाध्यक्ष विष्णूपंत पाखरे यांनी मार्गदर्शन केले.
खान्देश तेली समाज मंडळ, धुळे राज्यस्तरीय वधु-वर परिचय पुस्तिका प्रकाशन सोहळा, रविवार, दि.२९ नोव्हेंबर २०२० रोजी, सकाळी १०.०० वाजता कार्यालयीन पत्ता : शॉप नं.२, घर नं.२९२६, ग.नं.४, चैनी रोड कॉर्नर, धुळे मो.नं.९९२२५८९९९९, रजि नं. महा/१३७५५/२०१२/धुळे, Email : khandeshtelidhule@gmail.com
नारायणगाव तिळवण तेली समाजाचे सामाजिक कार्यातील गौरवास्पद कार्य व सुदिप भाऊ कसाबे यांच्याबद्दल गर्व गरिब व गरजूलोकांना मदतीचे कार्य चालू असताना सुदीपभाऊ कसाबे यांच्या पुढाकाराने गरिबांसाठी मदत म्हणून ५१०००/- रु. च्या ७०० तेलाच्या बाटल्या लक्ष्मी नारायण देवस्थान ट्रस्ट व तिळवण तेली समाजामार्फत नारायणगाव ग्रामपंचायतीस सरपंच श्री.बाबुभाऊ पाटे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या आहे.
कै. सावळेराम गुंडीबा देवकर, देवकर घराण्यात प्रसिद्ध. त्यांना एकच मुलगी व तिला देखिल मूलबाळ नव्हते. म्हणून त्यांनी वुईलपत्र केले की, तेली समाजास माझ्या मुलींच्या निधनानंतर ती जागा समाजाने ताब्यात घ्यावी व त्या ठिकाणी मंदिर बांधावे.
धुळे तेली समाजाचे माजी अध्यक्ष तथा कुसुंबा येथील रहिवासी शांताराम उखडू चौधरी यांचे हृदय विकाराने निधन झाले. शिरपूर नगर परिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा तथा नगरसेविका सौ. छाया शामकांत ईशी यांचे ते वडील तर महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष शामकांत ईशी याचे सासरे व पुणे येथील खान्देश तेली समाज मंडळाचे संस्थापक विश्वनाथ उखडू चौधरी, कुसुंबा येथील दिलीप चौधरी, रविंद्र चौधरी यांचे बंधू होत.