इवलासा वेल लाविला...... आज थोडे मागे वळून पाहिले.... तर एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे बघता बघता दोन वर्षं झाली... आमच्या अहमदनगरच्या ...आदर्श असा म्हणण्यास लावणारा हा वधू वर मेळावा पाहता पाहता तिसऱ्या वर्षात सुद्धा तितक्याच उत्साहाने यशस्वीपणे साजरा झाला. दिनांक १ डिसेंबर २०१९ रविवार रोजी झालेल्या या मंगल दिनी, ऐतिहासिक दिनी अहमदनगर शहर व जिल्हा तेली समाज, संताजी विचारमंच अहमदनगर याच बरोबर सर्व समाज बंधू-भगिनी यांच्यावतीने आयोजित.... भव्यदिव्य वधू-वर पालक परिचय मेळावा
इंदोरी, ता. २६ : दरवर्षी श्रीक्षेत्र सुदुंबरे येथे श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी उत्सव सोहळ्याचे जोरदार नियोजन सुरू आहे. या सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. यंदा समितीचे अध्यक्ष म्हणून इंदोरीचे उद्योजक जयंत सूर्यकांत राऊत यांची एकमताने निवड केली. श्री संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्थेच्या सर्वसाधारण सभेत ही निवड केली.
संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रम, मिरवणुकीस प्रतिसाद
संत जगनाडे महाराजाचे कार्य प्रेरणादायी
जालना तेली समाज : जगतगुरु संतश्रेष्ठ श्री. तुकाराम महाराजांची गाथा लिहून - काढणारे श्री संत जगनाडे महाराज यांचे कार्य प्रेरणादायी आहे. म्हणून प्रत्येकाने त्यांच्या कार्याचे अनुकरण करून आपले जीवन सुखकर करावे, असा हितोपदेश हभप, भगवान महाराज आनंदगडकर यांनी दिला आहे.
सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांची इगतपुरी तालुकास्तरीय पुण्यतिथी सोहळा मंगळवार, दि. २४/१२/२०१९ रोजी साजरा करण्या येणार आहे. सर्व तेली समाज बांधवांनी कार्यक्रमास सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित रहावे विनंती आयोजका कडुन करण्यात आलेली आहे.
शिर्डी : संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीनिमित्ताने व दि. १० डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिवसाचे औचित्याने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स अहमदनगर जिल्हा व शिर्डी शहर तसेच शिर्डी शहर तेली समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय विद्यार्थ्यांच्या झालेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण नगराध्यक्षा श्रीमती अर्चनाताई कोते यांच्या हस्ते करण्यात आले.